Breaking News

1/breakingnews/recent

३ जून सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश.!...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES

1. अखेर मान्सून केरळात दाखल

भारतीय हवामान विभागानं मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिलीय. केरळच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला असून नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिलीय. यंदाचा मान्सून पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीचं वर्तवला आहे.


२. लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल

 कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही लसींचा तुडवडा जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काही ठिकाणी लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. 

3. मुंबईत कोरोना नियंत्रणात, आसपासच्या महापालिकेतही 'मुंबई मॉडेल' राबवा; हायकोर्टाच्या सूचना
राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचा पारदुर्भाव नंतर आता  हळूहळू ओसरत असताना मुंबई हायकोर्टानं महापालिकेच्या नियोजनाचं कौतुक केलंय  याआधीच सुप्रीम कोर्टानंही मुंबई महापालिकेचं कौतुक केलं होतं. मुंबई लोकसंख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त असतानाही गेल्या आठवड्यापासून सातत्यानं कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

4. सुशांत सिंगच्या बॉडीगार्डची एनसीबीकडून कसून चौकशी
सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी एनसीबीने त्याच्या बॉडीगार्डला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी सुशांतच्या बॉडीगार्डची चौकशी केली होती. यापूर्वी एनसीबीने  नोकर नीरज आणि केशव यांना चौकशीसाठी बोलावले होते. सध्या अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एनसीबी सातत्याने तपास करत आहे. 

5. पुण्यात आरक्षणासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन
आरक्षणाच्या हक्कासाठी भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलय. सोशल डिस्टनसींगचा फज्जा उडवत आंदोलनकर्त्यांनी मनमानी कारभारही केलाय . तसेच आरक्षण आमच्या हक्काच, उठ ओबीसी जागा हो ! एकजुटीचा धागा हो !आशा घोषणाही देण्यात आल्यात.

6. मोठा दिलासा! कोरोनाची तिसरी लाट येणार, पण...!
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा दीड लाखांच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका काय आहे. 

7. बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढल्या; आता 'कोरोनिल'वरुन कोर्टानं बजावले समन्स
अॅलोपथी उपचारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच आता योगगुरू बाबा रामदेव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.दिल्ली मेडिकल असोसिएशननं 'पतांजलि'कडून 'कोरोनिल' संदर्भात चुकीची माहिती देण्यापासून रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.


8. गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश, राजकारणात घेणार 'पिंगा'

महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका आणि बॉलिवूडची सिंगर वैशाली माडे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तीने घड्याळ हाती घेतलं. त्यामुळे, आता वैशालीचा राजकारणात सूर लागणार आहे. 


9. चीनकडे सूर्याहून अधिक ताकदवान 'कृत्रिम सूर्य'

चीनमधून कोरोनाचा विषाणू जगभरात पोहोचला. कोरोना संकटामुळे जगात लाखो जणांचा बळी गेला. देशांच्या अर्थव्यवस्था गाळात गेल्या. मात्र ज्या चीनमधून कोरोनाचा विषाणू जगात सर्वदूर पो विशेष म्हणजे हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली आहे.


10. औषधांच्या अवैध साठेबाजीप्रकरणी 'गौतम गंभीर फाऊंडेशन' दोषी; हायकोर्टाचे कारवाईचे निर्देश

कोरोनाची लाट अतिशय तीव्र स्वरुपात असताना कोरोनाबाधितांची संख्या नवे उच्चांक गाठत होती. त्यावेळी भाजप नेते गौतम गंभीर यांनी कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या फॅ-बि-फ्लू या औषधांचे वाटप केलेले . मात्र, यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *