Breaking News

1/breakingnews/recent

4 जून Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - 'कोरोना वॉरियर्स' आशा सेविकेच्या बलिदानाची केंद्राकडून दखल......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये




TOP HEADLINES


1. डोंबिवलीत महावितरणचा विजेचा खांब कोसळण्याच्या वाटेवर
डोंबिवलीत टाटा पॉवर रोड वरील महावितरनचे विजेचे खांब हे कित्येक वर्षांपासून गंजलेले आहेत.व काही ठिकाणी लाईट्स चे पोल हे वाकलेल्या अवस्थेत असून.पडण्याच्या मार्गावर आहेत यातून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही .स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात वेळोवेळी महावितरणला तक्रार करून देखील अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत.वाकलेल्या अवस्थेतील खांब पडल्यावर मोठी दुर्घटना होण्याच्या अगोदर विजेचा खांब काढण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

2. भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मान्सूनपूर्व तयारीची रंगीत तालीम
येत्या काही दिवसात मान्सून धडकणार असुन, पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. मागील वर्षी मुसळधार पावसामुळे भंडारा शहरासह जिल्ह्याला महापुराला सामोरे जावे लागले होते. ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी,मागिल आठवड्यात, मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेतला. 

3. विद्या पटीलांच्या कुटूंबाला शिवसेना मनसेने दिला मदतीचा हात
डोंबिवलीत राहणाऱ्या विद्या पाटील रेल्वे ने प्रवास करत असताना लोकलच्या महिला डब्यात चोरट्याने प्रवेश करून विद्या यांच्या हातातील मोबाईल खेचला प्रतिकार करताना झटापटीत तोल जाऊन विद्या याचं दुर्दवी मृत्यू झाला.त्यांच्या जाण्याने तीन मुलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे.ही बाब शिवसेनेच्या लक्षात येताच डोंबिवली शिवसेना प्रमुख राजेश मोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांनी पाटील कुटूंबाची भेट घेतली. .

4. ठाण्यात मोटारसायकलच्या धडकेत पोलीस हवालदार जखमी
मोटारसायकलच्या धडकेत कोपरी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संजय पाटील हे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात मोटारसायकलचा चालक सुमित वोरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

5. पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू
औरंगाबाद मध्ये दोन दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात साचलेले पाणी पाहtन पोहायला गेलेल्या दोन तरुण मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झाल्टा गायरान शिवारात झाली. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

6. पुणे जिल्ह्याला मिळाल्या ८८ हजार लसी
पुणे जिल्ह्यात लसीकरण मोहीम ही लसींच्या तुटवड्याअभावी रखडली होती. यामुळे अनेक केंद्रे बंद पडले होते, तर लसीकरण सुरू असलेल्या काही केंद्रांवरून लस कमी असल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागले होते. मात्र, गुरुवारी जिल्ह्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे ८८ हजार ३६० नवीन लसीचे डोस देण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून हे डोस सर्व तालुक्‍यांना वितरित करण्यात आले आहे. 
 
7. मित्रावर प्राणघातक हल्ला
पुणे शहरात पेट्रोल भरण्यासाठी पैसे मागितल्यावर औकात काढल्याने चिडलेल्या तरुणाने मित्रावर चाकूने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.समर्थ पोलिसांनी फजल अब्दुल रशिद मुल्ला  याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फैजान अब्दुलगफूर शेख यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना भवानी पेठेत बुधवारी पहाटे साडेचार वाजता घडली.

8. महापालिकेच्या लसीकरण केंद्राचे श्रेय घेतायत काही लोकप्रतिनिधी
येत्या दोन महिन्यांत सर्व मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी प्रत्येक वॉर्डात एक असे २२७ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. मात्र पालिकेच्या खर्चातून उभ्या राहिलेल्या लसीकरण केंद्राचे श्रेय काही लोकप्रतिनिधी घेत असल्याचे समोर आले आहे. 

9. ठाणे जिल्ह्यात वाढत आहेत म्युकरमोयकोसिसचे रुग्ण
ठाणे जिल्ह्यात आतार्पयत म्युकरमोयकोसिस या आजाराचे रुग्ण दिवासगणिक झपाटय़ाने वाढू लागल्याचे दिसत आहे. मागील १५ दिवसात त्यात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आता या आजाराचे तब्बल २११ रुग्ण झाले असून त्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

10. 'कोरोना वॉरियर्स' आशा सेविकेच्या बलिदानाची केंद्राकडून दखल
कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नेमून दिलेले सर्वेक्षण तसेच कोरोनाबाधितांची माहिती गोळा करत माण येथील आशासेविका मंगल बलकवडे यांना कोरोनाने ग्रासले. कोरोनाशी लढताना त्यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *