8 जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - तिसरी लाट रोखण्यासाठी आशा सेविकांकडून आशा...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. तिसरी लाट रोखण्यासाठीआशा सेविकांकडून आशा
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आशा सेविकांकडून मुख्यमंत्री म्हणून मला मोठी आशा आहे. आजवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यातही त्यांची मोठी भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले. मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले.
No comments
Post a Comment