Breaking News

1/breakingnews/recent

7 जुन सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - तब्बल ६१ दिवसांनंतर देशात सर्वाधिक कमी कोरोनाबाधितांची नोंद...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. तब्बल 61 दिवसांनंतर देशात सर्वाधिक कमी कोरोनाबाधितांची नोंद;
जीवघेण्या कोरोना विषाणूनं बराच काळ संपूर्ण जगाची पाठ सोडलेली नाही. विकसीत देशांपासून ते अगदी विकसनशील देशांपर्यंत सर्वत्रच कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. भारतातही चित्र वेगळं नाही. मागील बऱ्याच दिवसांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्याचं पाहायला मिळत होतं. पण, आता मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट ही धीम्या गतीनं का असेना पण ओसरत असल्याचं दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये देशात 1 लाख 636 नवे कोरोनाबाधित आढळले. तर, 2427 नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर, 1 लाख 74 हजार 399 कोरोनाबाधितांनी या विषाणूच्या संसर्गावर मात केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *