14 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - बिहारमध्ये होणार राजकीय भूकंप...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. बिहारमध्ये होणार राजकीय भूकंप
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं दिसत आहे. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाच्या पाचही खासदारांनी बंडांचं निशाण फडकावलं असून, पक्षात फूट पडली असल्याचं समोर आलं आहे. चिराग पासवान यांच्यावर नाराज असलेल्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं असल्याचं वृत्त आहे. आपल्या वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या खासदारांनी केली आहे. पाचही खासदार पक्षांतर करण्याच्या वाटेवर असून, असं झाल्यास लोक जनशक्ती पार्टीला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, हे पाचही खासदार नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.
No comments
Post a Comment