Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगरचा इतिहास जोपासणे गरजेचे

No comments

   News24सह्याद्री - नगरचा इतिहास जोपासणे गरजेचे..पहा शहराची खबरबात मध्ये



TOP HEADLINES

१. निंबळक च्या आरोग्य केंद्रावर ग्रामपंचायत सदस्यांचा गोंधळ
नगर तालुक्यातील निंबळक येथील आरोग्य केंद्रावर लसीकरण करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि दमदाटी केल्याची घटना घडली आहे याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात रूपाली मोहकर यांनी फिर्याद दिलीय. राजेंद्र पोपट कोतकर, गोरक्ष मुरलीधर कोतकर, दत्तू गुलाब कोतकर आणि सुरेश बाबु कोतकर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

२. नगरचा इतिहास जोपासणे गरजेचे
नगर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलाय देशातील अहमदनगर हे एकमेव असे शहर आहे ज्याचा स्थापना दिवस साजरा करता येतो. नगर शहराची स्थापना होऊन आज 531 वर्ष पूर्ण झाले आहेत. आपल्या बागरोजा हडकोला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या शहराचा वाढदिवस साजरा करताना मनोमनी आनंद होतोय प्रत्येक नागरिकाने शहराबद्दल आपुलकी आणि अभिमान बाळगणे गरजेचे आहे.

३. रेशन दुकानात अफरातफर
अन्नधान्य तफावत आणि फेरफार  केल्याचे आढळून आल्याने नगर तालुक्यातील वाळकी येथील दुकानदारावर नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तपास करण्यात आलेला गहू-तांदूळ पोलिसांनी हस्तगत केलाय अरुण शिवाजी गोठे असं या आरोपीचं नाव आहे. गोठे  याचे वाळके शिवारात स्वस्त धान्य दुकान असून दुकानातील स्वस्त धान्य दुकानाचा पंचनामा केला असता त्यात अन्नधान्य यात तफावत आणि फेरफार  केल्याचे आढळून आले.

४. मनसे अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला
अहमदनगर शहर स्थापनेच्या दिवशीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी शहरातील कायनेटिक चौकात अहमदनगरला अंबिकानगर नाव द्यावे, अशी मागणी करणारा फलक उभा केला. गमिनी कावा करत मनविसेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी दोन वाजता केलेल्या आंदोलनामुळे नामांतराच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील वातावरण तापले होते. 

५. बोकड चोरणारे टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडली
शेतकऱ्यांच्या बकऱ्या आणि  बोकड चोरणारे व ते  विकत घेणाऱ्या आरोपीना  जेरबंद केले असून त्यांचे  सात गुन्हे देखील  उघडकीस आलेत. हि  कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली आहे.आरोपीमध्ये  नितीन  काळे, दान्या चव्हाण,संजय चव्हाण आणि  एक अल्पवयीन बालक यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलय   शकील शेख, महमंद शेख, शकीलबाबू शेख, महमंद हनिफ शेख नजीर, यांचाहि या गुन्ह्यात समावेश आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *