गॉसिप कल्ला - 'हिला शो बाहेर हाकला...' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला शन्मुखप्रियाने दिले उत्तर
News24सह्याद्री - 'हिला शो बाहेर हाकला...' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला शन्मुखप्रियाने दिले उत्तर... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
१.'हिला शो बाहेर हाकला...' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला शन्मुखप्रियाने दिले उत्तर, म्हणाली...
एकीकडे शोचा होस्ट आदित्य नारायण ट्रोल होतोय, दुसरीकडे शोची कंटेस्टंट शन्मुखप्रिया हिलाही सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. तिच्या परफॉर्मन्सवर नाराजी व्यक्त करत, अनेकांनी तिला शो बाहेर हाकलण्याची मागणी केलीय. आता या ट्रोलर्सला शन्मुखप्रियाने सणसणीत उत्तर दिले आहे. 'मला शोबाहेर हाकलण्याची मागणी होतेय, हे मला माझ्या काही शुभचिंतकाकडून माहिती झाले.
२. प्लीज माझ्या आईसाठी प्रार्थना करा...!
अभिनेत्री जरीन खान सध्या अनेक अडचणींचा सामना करतेय. गेल्या दीड महिन्यांपासून ती सोशल मीडियापासून दूर होती. आत्ता कुठे यामागच्या कारणाचा खुलासा केला. दीड महिन्यांपासून जरीनची आई आजारी आहे आणि जरीन तिची सेवा करतेय. आता जरीनच्या आईला पुन्हा रूग्णालयात भरती करण्यात आले.
३. सुशांत सिंग रजपूतच्या
जवळच्या मित्राला अटक
सुशांत सिंग रजपूतच्या स्मृतीदिनाच्या काही दिवस आधी NCB ने केली त्याच्या जवळच्या मित्राला अटक
सुशांत सिंग रजपूतने 14 जून 2020 ला जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. त्याच्या निधनाला पुढील महिन्यात एक वर्षं पूर्ण हाईल.
४. याला तुरूंगात डांबा...! रणदीप हुड्डाचा मायावतींवरचा 'डर्टी जोक' ऐकून भडकले युजर्स
बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे वाद ओढवून घेतात. ताजे प्रकरण आहे बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याचे. होय, आता या वादामुळे रणदीपच्या अटकेची मागणी होत आहे. माफी माग, याला अटक करा, अशी मागणी सोशल मीडियावर युजर्स करत आहेत.
५. कॅन्सरशी झुंज देत असलेल्या किरण खेर रूग्णालयात भरती
ज्येष्ठ अभिनेत्री व चंढीगड येथील भाजपाच्या खासदार किरण खेर सध्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. गुरूवारी त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी त्यांची बोन सर्जरी करण्यात आली. सकाळी 7.30 वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया 3 तास चालली. या शस्त्रक्रियेदरम्यान किरण यांच्या बोनमॅरोतून कॅन्सरच्या पेशी काढण्याचा प्रयत्न केला गेला.
No comments
Post a Comment