Breaking News

1/breakingnews/recent

'धोनीच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन पती - पत्नी संगतीनं घेत आहे खूप काळजी

No comments



News24सह्याद्री - 

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या घरी आता नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे.  इंडियन प्रीमियर लीग 2021 स्थगित झाल्यामुळे आपला संपूर्ण वेळ पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांना देत आहे. रांची येथील आपल्या घरी धोनी आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. त्याचबरोबर आपल्या पाळीव प्राण्यांचाही सांभाळ करत आहेत. धोनीच्या घरी नुकतेच नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याने कुत्र्यांसोबत एक नवा घोडा नुकताच पाळला आहे. तो आपल्या घोड्याची काळजी घेताना दिसत आहे. गुरुवारी (२७ मे) साक्षीने धोनीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या घोड्याची मालिश करताना दिसत आहेत. धोनीचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धोनी स्वतः सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. परंतु त्यांची पत्नी साक्षी नेहमी आपल्या पतीचे आणि मुलीचे व्हिडिओ शेअर करत असते. साक्षीच्या माध्यमातून चाहत्यांना समजते की, धोनी लॉकडॉऊनमध्ये कशाप्रकारे घरी वेळ घालवतो. मागील आठवड्यात साक्षीने आणखी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रसारित केला होता, ज्यामध्ये धोनी आपल्या कुत्र्यासोबत खेळताना दिसत होता. धोनी चेंडू फेकत होता आणि कुत्रा तो चेंडू उचलून परत घेऊन येत होता.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *