मोठी बातमी - अण्णा हजारे म्हणाले, निलेश लंके यांना वयाची १०५ वर्षे आयुष्य मिळो!
News24सह्याद्री -
पारनेरचे राष्टवादीचे आमदार निलेश लंके यांनी सुरू केेलेल्या कोवीड सेंटरचा गवगवा आता सातासमुद्रापार गेला आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेकांना या सेंटरने भुरळ घातलीय! ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी आज या सेंटरमधील रुग्णांना आजारातून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा दिल्या! हजारे यांनी फोनवरून या शुभेच्छा देताना आमदार निलेश लंके यांच्या कामाचे कौतुकही केले.
मी जगून उपयोग नाही तर माझी जनता जगली पाहिजे ही भूमिका घेऊन आमदार निलेश लंके यांनी हे सेंटर सुरू केले. रुग्णांना दिली जाणारी सुविधा आणि अन्य व्यवस्था निश्चितच चांगली आहे. अण्णांनी त्यांच्या कामाची दखल घेत आज थेट रुग्णांशी संवाद साधला आणि निलेश लंके यांना वयाची शंभरी नव्हे तर १०५ वर्षे मिळावी अशी सदिच्छा व्यक्त केली.
No comments
Post a Comment