मोठी बातमी - नितीन गडकरींचे महाराष्ट्राला अनोखे वाढदिवसाचे गिफ्ट
News24सह्याद्री -
'राज्यात काळ्या बुरशीचे ३२०० रुग्ण आहेत,' अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. 'या आजारावरील उपचारांसाठी राज्याला दैनंदिन १४ हजार इंजेक्शन कुप्यांची गरज असताना प्रत्यक्षात चार ते पाच हजार कुप्या मिळत आहेत. देशभरात या इंजेक्शचे उत्पादन अत्यंत मर्यादित असल्यानेच तुटवडा आहे .सध्या फक्त एकच कंपनी अॅम्फोटेरेसिन-बी' या इंजेक्शनचे उत्पादन करते. वर्ध्यात तयार झालेल्या इंजेक्शनचे वितरण येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. बाराशे रुपयांना एक कुपी या दराने औषध मिळेल, सध्या 'अॅम्फोटेरेसिन-बी'ची एक कुपी बाजारात सात हजार रुपयांना विकली जात आहे.
'गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे वर्ध्यातील जेनेटिक लाइफ सायन्सेसने इंजेक्शनचे उत्पादन सुरू केले आहे. तेथून उत्पादित करण्यात आलेल्या इंजेक्शनची एक कुपी बाराशे रुपयांना उपलब्ध असेल, अशी माहिती केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने 'ट्वीट'द्वारे दिली.केंद्र सरकारने बुधवारीच या इंजेक्शनच्या सुमारे २९ हजार अतिरिक्त कुप्यांचे वाटप राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले होते. सध्या महाराष्ट्रासह नऊ राज्यांना हा आजार अधिसूचित केला आहे. देशभरातील रुग्णसंख्या बुधवारी ११ हजारांवर होती.मात्र गडकरींच्या मदतीने रुग्णांना दिलासा मिळाला आहे .
१) राज्यात काळ्या बुरशीचे ३२०० रुग्ण
२) १४ हजार इंजेक्शन कुप्यांची गरज असताना प्रत्यक्षात चार ते पाच हजार कुप्या उपलब्ध
३) सद्यस्थितीला एकच कंपनीमध्ये अॅम्फोटेरेसिन-बी' या इंजेक्शनचे उत्पादन
४) सात हजार रुपये मूळ किंमत असताना बाराशे रुपयांना एक कुपी उपलब्ध होणार
५) नितीन गडकरी यांच्या कार्यालयाची 'ट्वीट'द्वारे माहिती
६) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना
बुधवारी इंजेक्शनच्या सुमारे २९ हजार अतिरिक्त कुप्यांचे वाटप
७) महाराष्ट्रासह नऊ राज्यांना हा आजार अधिसूचित
८) ११ हजारांवर रुग्णसंख्या असताना गडकरींच्या मदतीने रुग्णांना दिलासा
No comments
Post a Comment