Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - महापौर निवडणूक संदर्भात शिवसेनेच्या हालचाली सुरू

No comments

  News24सह्याद्री - महापौर निवडणूक संदर्भात शिवसेनेच्या हालचाली सुरू..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

१. ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 531व्या स्थापना दिनी विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणार्‍या नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराच्या वतीने कोरोना महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत नगरसाठी काम करणार्‍या कोरोना योद्धयांना चेंज मेकर्स अवॉर्ड-2021 व अन्नदान करणार्‍या संस्थांसाठी अन्नदाता सन्मान-2021 जाहीर करण्यात आले आहेत. 

2. महापौर निवडणूक संदर्भात शिवसेनेच्या हालचाली सुरू  
नगरच्या आगामी महापौर निवडणूक संदर्भात शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर शहर प्रमुख दिलीप सातपुते माजी शहरप्रमुख संभाजी कदम माजी सभागृह नेते अनिल शिंदे माजी महापौर भगवान फुलसौंदर शिवसेना गटनेते संजय शेंडगे आदी उपस्थित होते. 

3. सावेडीतील स्मशानभूमीतही बसवणार विद्युतदाहिनी
नालेगावातील अमरधामावर अंत्यविधीचा ताण वाढल्याने सावेडी पर्यायी स्मशानभूमी महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आली होती ,  तेथे सुमारे 71 लाख रुपये खर्चून विद्युत दाहिनी बसवण्याचे नियोजन प्रशासकीय स्तरावर सुरू आहे प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर होणार आहे. 

4. उपनगरात घरफोडी करणारे चौघे जेरबंद
सावेडी उपनगरात घरफोडी करणार्‍या चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. संदीप ऊर्फ संजु  गायकवाड मंगेश ऊर्फ अंकल  पवार शर्मा  काळे   राम सुदाम सौदागर  असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चौघांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.दोन दिवसापूर्वी सावेडी उपनगरातील पंचशील हॉटेल शेजारी असलेल्या महावीर सिरँमिक्स बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचे दुकान फोडून सहा लाख 48 हजार 800 रूपये किंमतीचे प्लंबिंग व बिल्डींगचे सामान अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. 

5.  नगर शहरामध्ये बाजारपेठ खुली करून परवानगी द्या : किरण काळे   
राष्ट्रवादीचे शहराचे लोकप्रतिनिधी नगर शहरातील व्यापारी आणि सामान्य नगरकरांनी वेड समजते का तुम्हीच मनपा प्रशासनाच्या aadunन आडवा पाय घालून बंद पडलेली बाजारपेठ आता मनपाला सुरू करायला सांगा नौटंकी बंद करा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यापाऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे नगर शहरातील बाजारपेठ बंद आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *