Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातय..., महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा मनमानी कारभार

No comments

     News24सह्याद्री - 




कोरोना प्रतिबंधक असणारी लस मिळविण्यासाठी रांगा लागल्याचे आपण पाहतो आणि त्यातून वाद झाल्याचेही पाहतो! नगरसह संपूर्ण राज्यात लसीचा मोठा तुटवडा आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी घेण्याचे आदेश काढले गेले. नंतर हाच आदेश फिरवला गेला आणि ४५ दिवसानंतर दुसरा डोस घ्या असे आदेश शासनाने काढले! आता तर थेट ८४ दिवसांनी लसीचा दुसरा डोस घ्या असे आदेश काढले गेले. यातून नागरिकांना लस मिळणे अवघड झाले. अनेकजणांना लसीची प्रतिक्षा असताना नगरमध्ये खासगी इसमाला लसींचा बॉक्सच देण्यात आला. 

अत्यंत धक्क़ादायक असा हा प्रकार आहे. लोकांना रांगा लावून लस भेटत नाही आणि इथे खासगी इसम लस घेऊन जातो!  नगरच्या महापालिकेतील आरोग्य केंद्रातून खासगी इसमाला या लसी कशा देण्यात आल्या असा सवाल भाजपाचे युवा नेते सुवेंद्र गांधी यांनी उपस्थित केला आहे. 

ज्याचा वशिला तोच लशीला ... खाजगी इसमाला दिला जातोय लशींचा साठा 
आंधळं दळतंय कुत्रं पीठ खाताय, महानगरपालिकेचा आरोग्य विभागाचा मनमानी  कारभार

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *