Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जिल्ह्यात २४ तासांत तब्बल ३७५ कोरोना बाधित मुलं आढळली

No comments

News24सह्याद्री - 




जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल पावणेचारशे करोना बाधित मुलं आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. मुलांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा मानली जातेय .करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातही नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय . मात्र, बाधितांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण लक्षणीय असल्याने ती धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १ हजार ८५१ करोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी सुमारे पावणेचारशे रुग्ण १८ वर्षांच्या आतील आहेत. त्यातही सात ते १४ वयोगटातील मुलांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झालीये. सुमारे दीड महिन्यानंतर नगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागलीय मात्र नव्या बाधित रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. १ वर्षाच्या बालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते. यापैकी बहुतांश रुग्ण कमी तीव्रतेची लक्षणे असलेले आहेत. गंभीर रुग्ण जवळपास नाहीत. असे असले तरी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. सध्या कडक लॉकडाऊन असला तरी खेळण्यासाठी आणि अन्य कारणांसाठी मुले बाहेर पडण्याचे, एकत्र मिसळण्याचे प्रमाण अधिक आहे. कुटुंबातील सदस्य अगर अन्य ठिकाणांहून संसर्गाची लागण झाल्याने मुलांमार्फत त्याचा प्रसार होत असल्याची शक्यता नाकारात येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *