शहराची खबरबात - अहमदनगर शहरात उद्यापासून लसीकरण सुरू करणार
News24सह्याद्री - अहमदनगर शहरात उद्यापासून लसीकरण सुरू करणार... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. अहमदनगर शहरात उद्यापासून लसीकरण सुरू करणार
सध्या लसीचा साठा हा गेल्या दोन दिवसापासून नगर शहरामध्ये न आल्यामुळे लसीकरण बंद आहे आज रात्री उशिराने साठा आल्यानंतर 45 वर्षाच्या पुढे व्यक्तीज्या फ्रंटलाईन मध्ये काम करत आहे , अशाना दुसरा डोस उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिले आहे.
2. आरोग्यमंत्र्यांकडे म्युकर मायकोसिसचे इंजेकशन उपलब्ध करून देण्याची मागणी
नगर शहरासह अहमदनगर जिल्ह्यात मुकर्र मायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने त्यावर उपचार होनारे इंजेकशन उपलब्ध करून देण्याची मागणी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह माजी नगर सेवक निखिल वारे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन केली आहे
3. हनीट्रॅप प्रकरणातील महिलेच्या संपत्तीची होणार चौकशी
जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणातील महिलेच्या सम्पत्तिची चौकशी होणार असून या महिलेने आतापर्यन्त ब्लॅकमेलिंग करून किती माया जमवली आहे हे या चौकशीतून समोर येईन , याप्रकरणामध्ये सहा जणांविरुद्ध खण्डणीचा गुन्हा दाखल झाला असून , या ब्लॅकमेलिंग मधून खण्डणी स्वरूपात घेतलेले पैसे त्या महिलेने कोठे गुंतवले आहे किव्हा कोणत्या बँकेत ठेवलेले आहे.
4. हॉलमार्क नसलेल्या सराफांवर कारवाई नको
केंद्र सरकारने एक जून पासून सराफ व्यवसायिकांना दागिने विक्रीसाठी हॉलमार्क अनिवार्य केले आहे या विरोधात सराफांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे भारतीय मानक ब्युरोने दिलेल्या मुदतीत हॉलमार्किंग करणे शक्य नसल्याचे म्हणणे व्यवसायाकडून मांडण्यात आले आहे त्यामुळे खंडपीठाने पुढील सुनावणी 14 जून रोजी ठेवली असून तोपर्यंत हॉलमार्किंग्च्या तरतुदीचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले.
5. एकविरा चौक येथे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी
नगर शहराची कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसापासून कमी होत असली तरी प्रशासन अद्यापही सतर्क असल्याचं दिसून येत आहे . मात्र काही निष्काळजी नागरिक अद्यापही विनाकारण फिरत असल्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विगाभातर्फे एकविरा चौक येथे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात अली.
No comments
Post a Comment