Breaking News

1/breakingnews/recent

'मिस्टर ३६०' पुन्हादक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये दिसणार नाही; बोर्डाने केले स्पष्ट

No comments



मुंबई -

बोर्डाने केला निर्णय जाहीर मागील काही दिवसांपासून 'मिस्टर ३६०' अशी ओळख मिळवलेला एबी डिविलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच पुनरागमन करेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की डिविलियर्सचा निवृत्तीचा अंतिम निर्णय होता. त्यामुळे आता डिविलियर्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की 'एबी डिविलियर्स बरोबरील झालेल्या चर्चांनंतर त्याने त्याच्या निवृत्तीचा निर्णय अंतिम ठरवला आहे.' त्यामुळे आता हे नक्की झाले आहे की डिविलियर्स पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये दिसणार नाही.

स्मिथ, बाऊचरने यापूर्वी दिले होते पुनरागमनाचे संकेत खरंतर काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालक ग्रॅमी स्मिथनेही डिविलियर्सच्या पुनरागमनाबद्दल संकेत दिले होते. त्याने म्हटले होते की जूनमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात डिविलियर्सचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होऊ शकते. तसेच त्यापूर्वी एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने डिविलियर्स टी२० विश्वचषकासाठी संघात पुनरागमन करु शकतो, असे संकेत दिले होते.

खरंतर मे महिन्यात २०१८ साली डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने विविध देशांतील व्यावसायिक टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळणे कायम केले होते. त्याचमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाच्या चर्चांना सातत्याने उधाण येत होते. एबी डीविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत २ आणि वनडेत ७ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने यष्टीरक्षण करताना २१९ बळी घेतले आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *