शहराची खबरबात - विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट
News24सह्याद्री - विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
१. जेष्ठ नागरीक यादव भोर यांच्या हस्ते पाईपलाईन चे उदघाटन
नगर मध्ये महानगरपालिका आहे मात्र त्यामध्ये शहराचा विकासा बाबत चोख नियोजन केले जात नाही.अनेक वर्षान पासून प्रलंबित असलेले शहरातील प्रश्न सूटत नाहीत. जो पर्यंत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तो पर्यंत आम्ही नागरिकांचे प्रश्न कायम सोडवत राहणार. असे प्रतिपादन नगरसेवक अशोक बडे यांनी केले. गेल्या अनेक वर्षापासून या माताजीनगर मध्ये पिण्याची पाईपलाईन नव्हती २००९ पासुन याबाबत महापालिकेत पाठपुरावा केल्यानंतर या भागात टॅकर सुरु झाले.
२. विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट
करुणा ची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची मोहीम महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे... चितळे रोडवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची अँटीजेन चाचणी करण्यात आली तर
३. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भैरवनाथ वाकळे यांची उपोषणाची नोटीस
अहमदनगर येथील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कॉ.भैरवनाथ वाकळे यांनी आज मनपा आयुक्त शंकर गोरे यांना लाक्षणिक उपोषणाची नोटीस मेल केली आहे. त्यामधे वाकळे म्हणतात कि, मनपा हद्दीतील शेतमाल 'भाजीपाला विक्री बंदी' उठवुन मार्केटयार्ड मधील फळे व भाजीपाला विक्री 'संयुक्तपणे गर्दीचे नियमन' करत सुरू करावी व शहर हद्दीतील लहान मुले, गरोदर महिला, आजारी नागरिक यांच्या सकस आहार खाण्याच्या मानवी हक्कावर गदा आणू नये.
४. एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला मारहाण
शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिल पांडुरंग आव्हाड असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे तसेच दादाभाऊ फ्रान्सिस वंजारे आणि कैलास साळवे या दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
५. अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीत प्राधान्यक्रम
अहमदनगर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करताना सध्या अवघड क्षेत्रात असणाऱ्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा बदलीसाठी ग्राह्य धरण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन मागावे आणि त्यानंतरच अवघड क्षेत्र जाहीर करावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाने केली आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी धोरण निश्चित करण्यात आले होते.
No comments
Post a Comment