मोठी बातमी - जिल्ह्यातील बाजार समित्याबाबत मोठा निर्णय
News24सह्याद्री -
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बुधवारपासून 31 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकरी आणि ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. संसर्ग वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. नगर शहरातील बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे. सरासरी दोन ते अडीच हजार रुग्ण रोज नव्याने आढळुन येत असताना त्यामुळे कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय आपत्ती निवारण समितीच्या बैठकीत घेण्यात आला, मंगळवारी एक दिवस बाजार समिती सुरू राहणार आहे. रात्री 12 नंतर 31 मे पर्यंत या बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
Tags:
No comments
Post a Comment