Breaking News

1/breakingnews/recent

28 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही – राहुल गांधी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

१. अग्निकांडाला पाच महीने लोटूनही फायर यंत्रणा अद्यापही लागली नाही
अँकर- भंडारा जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसून येत आहे. मात्र, म्युकर मायक्रोसिस आजाराच्या पार्श्‍वभूमीवर आणखी उपाययोजना करण्याची गरज असुन, सामान्यांच्या आरोग्याप्रती गंभीर नसलेले हे सरकार, शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यास असर्मथ ठरत असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.ते जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि धानाच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.

2. निलेश राणे यांची छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. या मुद्द्यावरून दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारकडे बोट दाखवत आहे. तर राज्यातील भाजपाचे नेते याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा दावा करत आहेत.

3. "दारुबंदी उठवून गुन्हेगारी कमी होईल असा जावई शोध या ठाकरे सरकारने लावला"
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने १एप्रिल २०१५ रोजी लागू केलेली दारूबंदी उठविण्यास डॉ. अभय बंग यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकत्र्यांनी, महिला व नागरिकांनी आणि मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनीही विरोध केला. 

4. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याच्या रुममेटला अटक
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता NCB ने त्याचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे.

५. हिंदुस्थानातील कोरोना मृतांचे खरे आकडे लपवले जात असल्याची बोंब जागतिक पातळीवर मारली जात आहे. ही बोंब मारण्यासाठी कुणीतरी ‘ट्विटर’चे माध्यम वापरले म्हणून मध्यरात्री दिल्लीच्या ‘ट्विटर’ मुख्यालयावरच पोलिसांनी धाडी घातल्या. आता या समाज माध्यमांवरही बंदी घालण्याचे विचार सुरू आहेत. आम्हाला वाटते, थोडे थांबायला हवे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर अशी घाईघाईने बंदी घातली.

6. अटकेत असलेल्या सुशील कुमारच्या आईनं उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
छत्रसाल स्टेडियमवरील सागर राणाच्या हत्येप्रकरणी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुशीलच्या आईने उच्च न्यायालयात मीडिया ट्रायल बंद करण्यासाठी एक याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायालय सुनावणी करणार आहे.सुशील कुमारची आई कमला देवी यांनी कायद्याचा विद्यार्थी असलेल्या श्रीकांत प्रसादसह ही याचिका दाखल केली. ”सुशील कुमारप्रकरणी मीडिया ट्रायल सुरू आहे. 

7. ‘लक्षवेधी’ बैठकीसाठी आज मुंबईत येणार BCCIचा ‘बॉस’!
आयपीएल २०२१मधील उर्वरित सामने, यंदाचा टी-२० वर्ल्डकप आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय उदया २९ मेला विशेष बैठक (एसजीएम) घेणार आहे. या बैठकीसाठी बीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आज रात्री मुंबईत दाखल होईल. भारत करोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. 

8. कोरोनामुळे कोबीला मातीमोल भाव

कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणी भाजीपाला विक्रीतून सोडविता येतील, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि खरिपाच्या पेरणीचा खर्च निघेल, अशी मनोमन गणिते मांडणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. करोनामुळे भाजीपाला बाजारपेठ बंद आहे. 

9. समस्या ही आहे की सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही – राहुल गांधी
देशात सध्या करोनाची दुसरी लाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारपरिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, अनेकदा सरकारला करोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. 

10. १२वीच्या परीक्षांबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (आयसीएसई) मंडळाच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी थेट रद्द करण्याची मागणी करण्यात आली करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी सोमवारी घेणार असल्याचे सांगितले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *