28 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - पिंजर्यात अडकलेल्या बिबट्याने पिंजरा तोडून केले पलायन...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु करावी अन्यथा उपोषण करू भाजीपाला असोशियन
गेल्या दीड महिन्यासांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाजीपाला विभाग बंद आहे तरी हा बाजार लवकरात लवकर पुन्हा सुरु करावं अशा मागणीच निवेदन अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोशियन यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
2. कृषी उत्पन्न बाजर समिती येथील पार्किंग आणि ओपन स्पेस जागा मोकळी करून द्यावी पालिका आयुक्तांना निवेदन
अहमदनगर जिल्ह्यातील नगर कृषी उत्पन्न बाजार समीती ही प्रमुख बाजारपेठ असल्यानं जिल्ह्यातून अनेक भागांतून बाजार समिती आवारात माल खरेदी साठी आणि विक्रेसाठी येतात. बाजार समितीनं पुढील शंभर वर्षांचं नियोजन करून सॅन १९७५ साली कृषी उत्पन्न समितीच्या प्रशस्त जागेत भुसार आणि भाजीपाला विभाग हा स्वतंत्र जागेत उभारला मात्र कृषी उत्पन्न बाजार समीतीमधील वेळोवेळीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासन यांनी त्यांच्या आर्थिक फायद्यापोटी ओपन स्पेस ,पार्किंग, सर्व्हिस रोड अशा जागेंवर अनाधिकृत बांधकाम केल्याने शेतकरी उत्पादित मालविक्रीस अढथळा निर्मण होत आहे.
3. सोनई पोलिसांनी वाळू चोरीचा टेम्पो पकडला
सोनई-कांगोणी रस्त्यावरुन रात्रीचा फायदा उठवत वाळूची चोरटी वाहतुक करत असलेल्या टेम्पोसह दोन आरोपीस सोनई पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सोनई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवार दि.26 मे च्या रात्री सोनई-कांगोणी रस्त्यावर पोलीस पथकाने छापा टाकून चोरटी वाळू वाहतुक करणारा टेम्पो (एमएच 12 5633) सह आरोपी सचीन रामदास माळी व विक्रम सुभाष माळी (दोघे रा. मांजरी ता.राहुरी) यांना अटक केली आहे.
4. वडाळाबहिरोबा येथील रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणाचा तपास लावा
तपास लवकर लावावा या मागणीसाठी नेवासे तालुका काँग्रेसच्या वतीने ) शनिशिंगणापुर पोलिस ठाण्यासमोर चार तास धरणे आंदोलन करण्यात आले. फरार आरोपी व संबंधित रॅकेटवर लवकरच गुन्हा दाखल करण्याच्या अश्वासनानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.
5. पिंजर्यात अडकलेल्या बिबट्याने पिंजरा तोडून केले पलायन
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर परीसरात धुमाकुळ घालत असलेल्या बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात अडकला, मात्र त्याने पिंजरा तोडून, जमिनीला खड्डा करत पिंजर्यातून पलायन केल्याची घटना घडली. या घटनेने शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली असून वनविभागाचीही चांगलीच धांदल उडाली आहे.
6. ‘संगमनेर’ सहाव्या, ‘मुळा’ नवव्या तर ‘गंगामाई’ दहाव्या क्रमांकावर
राज्यातील यंदाचा 2020-21 चा गाळप हंगाम 208 दिवस चालला असून 190 साखर कारखान्यानी एकूण 1012 लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण करून 106.3 लाख टन साखर उत्पादीत केली आहे. राज्यातील ऊस गाळपात नगर जिल्ह्यातील अंबालिका (16.08 लाख टन) दुसर्या क्रमांकावर, भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना (14.50 लाख टन) चौथ्या, संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना (13.03 लाख टन) सहाव्या, सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना (12.58 लाख टन) नवव्या क्रमांकावर तर शेवगाव येथील गंगामाई इंडस्ट्रीज लि. (12.55 लाख टन) दहाव्या क्रमांकावर आहे.
7. कोपरगाव : नगरपरिषदेच्या कर्मचार्यांना 5 लाखाचे विमा कवच
करोना काळात कोपरगांव नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी कोरोना योद्धे म्हणून काम करणार्या कर्मचार्यांचा 5 लाखाचा विमा, नगरपरिषदेमार्फत एच.आर.सी.टी स्कॅनींग मशीन,ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, अद्यावत कार्डीयाक अँम्बुलन्स तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांतर्गत येणार्या विकास कामांना स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेमध्ये मंजुरी दिल्याची माहिती उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, भाजपा गटनेते रविंद्र पाठक व शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी दिली.
8. जिल्ह्यात सर्वप्रकारचे बेड्स मुबलक प्रमाणात उपलब्ध - जिल्हाधिकारी
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रणात येत आहे. मात्र, राज्यातील 18 जिल्हे रेड झोनमध्ये असून या जिल्ह्यातील रुग्णांना गृह अलगिकरणात (होम आयसोलेशन) न ठेवता संस्थात्मक अलगिकरणात (इन्स्टिट्युशनल आयसोलेशन) ठेवण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे कोविड केअर सेंटरवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर व खांटाच्या उपलब्धतेची विचारणा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना विचारले असता त्यांनी जिल्ह्यात खाटा मुबलक उपलब्ध असल्याची माहिती दिली.
9. नेवासा : विनाकारण गर्दी करणार्यांची अॅन्टीजेन चाचणी करा
गावात विनाकारण गर्दी करणार्यांची रॅपिड अॅन्टीजेन तपासणी करा. नियमांचे पालन न करणार्यांवर गुन्हा दाखल करा अशी सूचना प्रांताधिकारी गणेश पवार यांनी केली. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे प्रांताधिकारी गणेश पवार व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत करोनासंदर्भात बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
10. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
नित्यसेवा हॉस्पिटल दवाखान्यात येणाऱ्या जाणाऱ्या व नातेवाईकांची त्यामुळे गैरसोय होत असते रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक माणसाला मोकाट जनावरांमुळे असुरक्षित वाटत आसते वाहतुकीस देखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.
No comments
Post a Comment