शहराची खबरबात - कॉंग्रेसने ठोकला महापौर पदावर दावा
News24सह्याद्री - कॉंग्रेसने ठोकला महापौर पदावर दावा... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. सराईत गुन्हेगार विजय पठारे जेरबंद
शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे व त्याचा साथीदार करण पाचारणे यांना तोफखाना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे व त्यांच्या सोबतच्या पाच कर्मचार्यांनी रविवारी रात्री ही कामगिरी केली. तोफखान्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ही माहिती दिली.
2. जिल्हा रुग्णालय आवारात वाहने पार्किंग करु द्या; कर्मचाऱ्यांचे आंदोलन
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाहने पार्किंग करण्यास बंदी घातली आहे.
सर्वसामान्यांसह कर्मचाऱ्यांनाही वाहने बाहेर पार्क करावी लागत आहे. यामुळे आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वाहने पार्किंगवरून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
3. नॉन कोविड आरोग्य सुविधांमध्ये नगर राज्यात अव्वल
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंंद्रात कोविड सुविधांनसह नागरिकांना विविध नॉन कोविड सुविधा देण्यात येत आहे. यामुळे नगर जिल्हा एप्रिल महिन्यांच्या नॉन कोविड कामाच्या उद्दिष्ट पूर्ण करण्यात राज्यात पहिल्या स्थानावर आहे.
4. कॉंग्रेसने ठोकला महापौर पदावर दावा
महापालिका अस्तित्वात असल्यापासून काँग्रेसला केवळ एकदाच महापौरपदाची संधी मिळाली ही संधी राष्ट्रवादी शिवसेनेला अनेक वेळा मिळाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत नगरसेविका शीला दीपक चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे.
5. पॅसिफिक कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी आधार
नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे असे असतांना नगर शहरातील स्वास्तिक चौक येथे पॅसिफिक कोविड सेंटर रुग्णांसाठी मोठा आधार बनले आहे या ठिकाणी 40 बेड असून त्यामध्ये 20 ऑक्सिजन बेड आहेत तज्ञ डॉक्टर्स आणि व्हेंटिलेटर बेडची ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे.
No comments
Post a Comment