24 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - कोरोना नैसर्गिक आजार आहे, यावर विश्वास बसत नाही - अॅंथनी फौची...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. पंजाबनंतर दिल्लीलाही मॉडर्नानं लस पुरवण्यास दिला नकार
विदेशी फार्मा कंपन्या फायझर आणि मॉडर्ना नं दिल्ली सरकारला लस पुरवण्यास नकार दिलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती दिली. "दोन्ही कंपन्यांनी आम्हाला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे," असं अरविंद केजरीवाल म्हणाले. यापूर्वी मॉडर्नानं पंजाब सरकारलादेखील लसीचा थेट पुरवठा करणार नसल्याचं म्हटलं होतं. थेट केवळ केंद्र सरकारला लसी पुरवल्या जातील असं त्यांनी म्हटलं होतं.
2. मंत्रिमंडळातून काँग्रेस बाहेर पडणार? ऊर्जामंत्री नितीन राऊत
मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा जीआर रद्द करण्याच्या मागणीवरून सरकार दरबारी बराच गोंधळ झालाय. मात्र, जीआर रद्द झाला नाही किंवा त्याला स्थगितीही दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरुन, काँग्रेस विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरूच असल्याचे दिसून येते. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस नेहमीच मागासवर्गीयांच्या पाठिशी असल्याचे म्हटले.
3. सुशील कुमारला फासावर लटकवा, तो राजकीय दबाव वापरू शकतो
२३ वर्षीय कुस्तीपटू सागर धनकड च्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार ला पोलिसांनी अटक केले. या प्रकरणी योग्य तपास व्हावा अशी मागणी सागरच्या कुटुंबीयांनी केली आहे. सुशील या प्रकरणात त्याच्या राजकीय ओळखींचा वापर करू शकतो, अशी भीती सागरच्या कुटुंबीयांना वाटत असून त्यांनी सुशीलला फासावर लटकवण्याची मागणी केलीय
4. भाजपच्या माजी आमदाराचं फेक फेसबुक प्रोफाईल, मित्रांकडे पैशाची मागणी
नागपुरात भाजपच्या माजी आमदाराचं फेक फेसबुक प्रोफाईल तयार करण्यात आलं. या बनावट अकाऊण्टवरुन ओळखीच्या व्यक्तींकडे पैसे मागण्यात आलेत. नागपूरमधील भाजप नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांचं फेक फेसबूक आयडी तयार करण्यात आलं होतं.
5. मस्तच! कोरोना चाचणीचा निष्कर्ष मिनिटात कळणार
कोरोना चाचणी झाल्यानंतर त्याचा अहवाल मिळण्यासाठी लागणारा वेळ अनेकदा प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरतो. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना अहवाल मिळवण्यासाठी काही तासांचा कालावधी लागतो. काही ठिकाणी तर अहवाल प्राप्त होण्यास एक ते दोन दिवस लागतात. सिंगापूरमधील एका स्टार्ट अपनं यावर एक उपाय शोधून काढलाय.
6. परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन
ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी अंतरिम दिलासा दिला होता. साेमवार, २४ मे पर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात ९ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.
7. बाबा रामदेव यांचं 'पतंजलि' कोरोनाच्या विळख्यात!
योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद संस्थेवरही कोरोनाचं संकट कोसळलंय . पतंजलिच्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ५७ वर्षीय सुनील यांचं निधन १९ मे रोजी झाल्याचं म्हटलं आहे.कोरोनाचं इन्फेक्शन वाढल्यामुळे सुनील बन्सल यांची फुफ्फुसं निकामी झाली होती.
8. नगर, यवतमाळ, सिंधुदुर्गसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये
कोरोनाची तिसरी लाट ! आणि ब्लॅक फंगसचं थैमान ! यामुळे महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. आता त्यामध्ये शिथीलता आणण्याच्या हालचाली सुरु असल्या तर काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये आहेत. या रेड झोन जिल्ह्यांमध्ये सरसकट शिथीलता आणता येणार नाही, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत.
9. डेथ सर्टिफिकेटवर कोरोनाचा उल्लेखल का नाही?-- सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाने आज कोरोनाशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी केली. कोरोनामुळ मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाण पत्रावर कोरोनाचा उल्लेख का केला जात नाही,? अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केंद्राकडं केली आहे. जर सरकारनं त्यांच्यासाठी काही योजना जाहीर केली तर मृतांच्या कुटुंबीयांना त्या योजनेचा लाभ कसा दिला जाईल अशी विचारणा करण्यात आली आहे.
10. कोरोना नैसर्गिक आजार आहे, यावर विश्वास बसत नाही - अॅंथनी फौची
चीनच्या लॅबमधून कोरोनाच्या व्हायरसच्या उत्पत्तीच्या निमित्ताने अनेक तर्क वितर्कांना आता उधाण आले आहे. अशातच अमेरिकेतील बायडन प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार असलेले "डॉ अॅंथनी फाऊची" यांनी एक मोठे वक्तव्य केलय कोरोना महामारी नैसर्गिक आहे की ? लॅबमध्ये निर्माण करण्यात आलेले बायोलॉजिकल वेपर आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक देश कामाला लागलेले असतानाच फौची यांचे मोठे विधान समोर आले आहे.
No comments
Post a Comment