Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - प्रभास आता हॉलिवूड मध्ये

No comments

   News24सह्याद्री प्रभास आता हॉलिवूड मध्ये..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES

१. 'देवा कृपा कर आणि घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव..
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 76 वी जयंती. बाबाच्या वाढदिवशी अभिनेता रितेश देशमुखने एक भावुक पोस्ट केली आहे. सून जेनेलिया डिसुजा देशमुख हिनेही सास-यांसाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. बापलेकीची ही मिठी चिरंतन राहील, अशा आशयाचे कॅप्शन देत जेनेलियाने पोस्ट शेअर केली आहे.रितेशने बाबासोबतचा एक जुना फोटो शेअर करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'देवा कृपा कर आणि घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव... तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही बाबा... हॅपी बर्थ डे...,' असे ट्विट रितेशने केले आहे.

२. प्रभास आता हॉलिवूड मध्ये
साउथ सुपरस्टार प्रभासची लोकप्रियात केवळ देशातच नव्हे तर जगभरात पसरली आहे. बाहुबली फेम प्रभासने अगदी कमी काळात देशासह जगभरात स्वत:ची ओळख निर्माण केलीय. साउथमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्रभाससाठी बाहुबली सिनेमा आयुष्यातील नवं वळण ठरला. या सिनेमानंतर प्रभासच्या सिनेमांना देशभरातून पसंती दिली जातेय. प्रभासच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडनंतर आता प्रभास हॉलिवूडमध्ये त्याची जादू दाखवणार आहे.

३. नेटकऱ्याने किंग खानच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली नसली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सुहाना नेहमीच चर्चेत असते. २२ मे रोजी सुहानाने तिचा २१ वा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्ताने गौरी खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने किंग खानच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.गौरीने ट्विटवर एक फोटो शेअर करत सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

४. सलमान खानच्या लीगल टीमतर्फे अभिनेता कमाल आर खानला नोटीस
आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता कमाल रशिद खानला बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानसोबत पंगा घेणं चांगलंच महागात पडलंय. अभिनेता सलमान खानने केआरकेच्या विरोधात मुंबई कोर्टात मानहानीचा दावा ठोकलाय. हे प्रकरण सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात आहे. 

५. मनोजने सांगितले शारुखसोबतचे किस्से
मनोज वाजपेयी भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांवर त्यांने आपल्या अफलातून अभिनयाची छाप सोडली आहे.नुकतीच मनोजने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने अनेक खासगी गोष्टी सांगितल्या आहेत. ‘शाहरुख खान हा एकमेव व्यक्ती होता जो त्यावेळी मारुती व्हॅन घेऊन येत असे. माझ्या आजही लक्षात आहे त्यावेळी त्याच्याकडे लाल रंगाची मारुती व्हॅन होती. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *