Breaking News

1/breakingnews/recent

Special report - फेसबुक,इंस्टाग्राम ,ट्विटर बंद झालं तर...

No comments

  News24सह्याद्री - फेसबुक,इंस्टाग्राम ,ट्विटर बंद झालं तर.....पहा सह्याद्री special रिपोर्ट





भारतामध्ये मागच्या एक ते दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीने थैमान घातलं आहे, भारतात अनेक लोकांना या महामारीच्या काळात भीषण संकटाला सामोरे जावं लागत आहे, कुणाला बेड मिळत नाही, तर कुणाला औषध आणि याच औषधांअभावी अनेकांचा जीव गेल्याचे चित्र हि आपण पाहिलं आहे, मात्र एवढी मोठी समस्या आपल्या प्रत्येकासमोर उभी असताना सध्या सोशल मीडियावर मागच्या २ ते ३ दिवसांपासून फेसबुक,इंस्टाग्राम ,ट्विटर यांसारखे सोशल मीडिया प्लँटफॉर्म बंद होणार असल्याच्या अफवांना सध्या उधाण आलं आहे. तस पाहिलं तर हि सगळी मनोरंजनाची माध्यमे आहेत यांच्या बाबत आलेल्या कोणत्याही अफवांना इतकं महत्व देणं गरजेचं आहे का हे देखील ध्यानात घ्यायला हवं .जो तो कोरोना महामारीची तीव्रता विसरून आता आपलं महत्वाचं सोशल नेटवर्किंग बंद होणार याच चिंतेत असल्याचे दिसत आहे. २१ डिसेंबर २०१२ साली देखील जग बुडणार असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये चवीने चघळल्या गेल्याचे चित्र देखील आपण अगदी जवळून अनुभवलं आहे, हि निव्वळ एक अफवा असल्याचे सिद्ध झालं होत. असाच प्रकार आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बाबतीत घडताना दिसत आहे. मात्र  नक्की असं काय झालं आहे की ,ज्यामुळे मोठ्या सोशल मीडिया कंपन्या बंद होणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली लागू करत असल्याची घोषणा 25 फेब्रुवारीला केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद तसंच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.  25 फेब्रुवारी 2021 ला भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल कंटेंटला रेग्युलेट करण्यासाठी तीन महिन्यांच्या आत कंम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकारी नेमण्यास सांगितलं होतं. हे सर्वजण भारतातून काम करणं अपेक्षित होतं. मात्र अजूनही  या कंपन्यांनी हे आदेश पाळलेले नाहीत. ज्यामुळे या कंपन्यांच्या इंटरमीडियरी स्टेटला संपुष्टात आणलं जाऊ शकतं, शिवाय त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते. केंद्रसरकारची ही नियमावली लागू करण्याची मुदत आज २६ मे  ला  समाप्त होत आहे. मात्र, कंपन्यांनी नियमावली लागू न केल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

आजपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर  नवीन  निर्बंध लागू होणार असल्याचं बोललं जातंय. या कंपन्यांना  केंद्रीय माहिती आणि  प्रसारण मंत्रालयाकडून नवीन नियमांची अंमलबजावणी  करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र कोणीही या नियमाचे अजून पालन केलेले नाही.  ट्विटरचे इंडियन व्हर्जन असलेले Koo हा एक मात्र प्लॅटफॉर्म आहे, ज्याने नवीन नियमांची अंमलबजावणी केली आहे. जर कंपन्यांनी या नियमांना लागू केले नाही तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सरकारी आकड्यांनुसार, भारतात WhatsApp चे ५३ कोटी, Youtube चे ४४.८ कोटी, Facebook चे ४१ कोटी, ट्विटरचे १.७५ कोटी आणि Koo वापरणाऱ्या यूजर्सची संख्या ६० कोटी आहे.


१. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भारतात नोडल अधिकारी, तक्रारींसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल, जे भारतात असणे आवश्यक आहेत. हे अधिकारी १५ दिवसांच्या आत ओटीटी कॉन्टेंटविरोधात आलेल्या तक्रारींचे निवारण करतील.

२. नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला एक मासिक हवाल जारी करावा लागेल, ज्यात तक्रार आणि त्यांच्या निवारणाबद्दल माहिती असेल. सोबत कोणत्या पोस्ट आणि कॉन्टेंटला हटवले आणि  याचे कारण काय होते, याबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा भारतातील पत्ता असणे गरजेचे आहे, जो कंपनीच्या मोबाइल अॅप आणि वेबसाइटवर नमूद असेल.

३. नियमांनुसार, तक्रारीच्या २४ तासांच्या आत इंटरनेटवर आपत्तीजनक कॉन्टेंट काढून टाकावा लागेल. याशिवाय कंपन्यांना तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विशेष प्रक्रिया आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. २४ तासात तक्रार नोंदवली जाईल व १५ दिवसात त्याचे निवारण करावे लागेल. अशी हि लागू झालेली नवीन नियमावली आहे.

सरकारने या सर्वांना तीन महिन्यांनी मुदत दिली होती. पण अनेकांनी त्यासाठी मुदत वाढ मागितल्याची चर्चा आहे. पण अजूनही सरकारने त्यांना मुदत वाढ दिल्याची कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.
भारताच्या राजकीय वर्तुळात देखील अनेकदा अफवांचा खच पडत असल्याच चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळत.अनेकदा अफवांचे बळी आपणही होतो. मागच्या काही दिवसांपूर्वी मीडियाने उचलून धरलेले पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण,सचिन वाझे प्रकरण हे त्याचे उदाहरण म्हणून घेता येईल सद्यस्थितीत या प्रकरणावर कोणीही बोलत  नाही, म्हणजेच लोकांची मानसिकता वळवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय हे उघड आहे. पुन्हा राजकारणात एखादी नवीन घटना घडली कि मग मागची सगळी चर्चिली गेलीली सर्व प्रकरणे हि दुर्लक्षित होतात. मात्र, एखादी अफवा जर पसरली तर सगळीकडे चर्चा तर होतेच. असच काहीसे फेसबुक,इंस्टाग्राम ,ट्विटर बंद होणार या गोष्टीबाबत झालं आहे. आज देखील फेसबुक,इंस्टाग्राम ,ट्विटर हे तीनही सोशल मीडिया वापरताना युजर्सला कोणताही प्रॉब्लेम जाणवलेला नाही. मात्र कंपन्यांनी जरकेंद्रसरकारच्या नवीन नियमावलीचा स्वीकार केला नाही तर मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बंद होण्याची शक्यता आहे. मात्र हे  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जर बंद झाले तर नागरिकांना अनेक समस्या येेण्याची शक्यता आहे.तसेच ज्यांना हा मीडिया वापरण्याचे व्यसन लागलं आहे, त्यांना हरवल्यागत भासेल का ? आणि ज्या लोकांना या मीडियाच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत सुरु आहे त्यांचे काय होणार या सर्वच प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळतील.

१. भारतात नोडल अधिकारी व तक्रारींसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करावी   

२. कंपन्यांनी मासिक अहवाल जारी करावा
 तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विशेष प्रक्रिया व अधिकाऱ्याची नेमणूक करावी     
 सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा भारतातील पत्ता द्यावा    

 ३.  तक्रारीच्या २४ तासांच्या आत इंटरनेटवर आपत्तीजनक कंटेन्ट काढून टाकावा  
  कंपन्यांना तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विशेष प्रक्रिया व अधिकाऱ्याची नेमणूक करावी  
  २४ तासात तक्रार नोंदवली जाईल व १५ दिवसात त्याचे निवारण करावे   

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *