Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - पाणीपुरवठा विभाग कर्मचाऱ्याला मारहाण

No comments

   News24सह्याद्री - पाणीपुरवठा विभाग कर्मचाऱ्याला मारहाण..पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES

1. पालकमंत्र्यांच्या हस्ते  ध्वजारोहण कार्यक्रम सपंन्न .
अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते  महाराष्ट्र दिनाच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने सपार पडले .

2. पाणीपुरवठा विभाग कर्मचाऱ्याला मारहाण    
महानगरपालिका  हद्दीतील गांधीनगर बोल्हेगांव भागात पाणी वाटपास असलेले पाणीपुरवठा विभाग कर्मचारी गणेश मारुती गव्हाणे हे नेहमी प्रमाणे गांधीनगर भागात  पाणी वाटप करीत असताना ४ जणांनी आडवुन आमच्या घरातील नळाला पाणी येत नाही, तुम्ही येथेच थांबा म्हणत वाद घालुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता च्या दरम्यान घडली या प्रकरणी गव्हाणे यांच्या तक्रारी वरून तोफखाना पोलीस ठाण्यात चार जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय  .

3. नियोजनबद्ध  लसीकरण होण्यासाठी भाजपाकडून मनपा आयुक्तांना निवेदन  
मे महिन्यात नगर  शहरातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नियोजनबद्ध लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने महा नगर पालिका  आयुक्त शंकरराव गोरे यांना उपाययोजनांची निवेदन दिले आहे .

4. जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त  मॅककेअर हॉस्पिटलला ऑक्सीजन सिलेंडर
संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा पहायला मिळत आहे त्यामुळे मदतीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत मॅककेअर हॉस्पिटलला ३१ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर देण्यात आले. 
 
5. शहर बँकेतील फसवणूक प्रकरणी खंडपीठात याचिका
शहर सहकारी बँकेतील कर्जदाराने झालेल्या फसवणूक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वारंवार तक्रार करूनह कारवाई होत नसल्याने ही याचिका दाखल करण्यात आलिये .तक्रारदाराचे नाव बाबुलाल सुमेरमल बच्छावत असे आहे. याचिकेत त्यांनी म्हटले आहे, की आपणास तीन कोटी रूपयांचे कर्ज मंजूर झाले होते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *