Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - आनंद ऋषी हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण

No comments

       News24सह्याद्री -

कोरोनाचा कहर  दिवसेंदिवस वाढत असून यामुळे सर्वच हॉस्पिटल सध्या पूर्ण भरली आहेत त्यामुळेच आता ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवर इंजेक्शन साठी नागरिकांची धावाधाव होत आहे या सर्व प्रकारतून  सुटका झाल्यानंतर पेशंट पूर्ण बरा होतो का नाही याचीही खात्री रुग्णांच्या नातेवाईकांना नसते यातूनच आता रुग्णांचे नातेवाईक आक्रमक होऊ लागले आहेत हॉस्पिटल मधील स्टाफ आणि रुग्णांच्या नातेवाईकांची रोजच वादावादी होतानाचा चित्र ठिकठिकाणी दिसून येतय मात्र या संकटाच्या काळातही डॉक्टर आणि दवाखान्यातील स्टाफ अत्यंत संयमीपणाने हे सर्व परिस्थिती हाताळत आहेत.

 मात्र तरीही डॉक्टरांवर हात उगारण्याचे प्रकार थांबताना दिसत नाही काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातही असाच प्रकार होऊन जिल्हा रुग्णातील icu दालनाची काच फोडण्याचा प्रकार घडला होता याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाला काही दिवस होत नाही तोच आता नगर शहरातील आनंद ऋषी हॉस्पिटल मध्ये अत्यंत चिंताजनक असलेल्या गेल्या दहा दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांकडून आनंदऋषी हॉस्पिटल मधील डॉक्टरला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी ima वतीने करण्यात आली आहे या प्रकरणात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *