Breaking News

1/breakingnews/recent

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ए, सी आणि डी फायदेशीर, वाचा

No comments
News24सह्याद्री -

 कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल केले आहेत. कोरोनापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ए, सी, डी सह आहारात जस्त आणि सॅलिनियमयुक्त पोषक घटकांचा समावेश करा. अँटी-ऑक्सिडंट शरीर खराब होण्यापासून प्रतिबंधित करते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. पपईचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून आराम मिळतो. पपई दररोज निश्चित प्रमाणात खाऊ शकतो. उन्हाळ्यात, याच्या सेवनामुळे दिवसभर शरीरात उर्जा राहते.जर आपण वजन कमी करण्यासाठी प्लान करीत असाल तर आपण पपईचे सेवन करणे आवश्यक आहे.

पेरु हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरु त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे. पेरू हा व्हिटॅमिन ए सीचा मोठा स्त्रोत आहे. ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरु खावीत. याशिवाय पेरु रक्त शुद्ध करण्याचे कामही करतात. फणस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फणस हे चवदार तर आहेतच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. फणस हे भाजी आणि फळ म्हणून वापरले जाते. यात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियमचे असे भरपूर गुणधर्म आहेत फणस खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वेगाने वाढते.

आवळा आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जेवढा फायदेशीर आहे त्यापेक्षाही अधिक आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटामिन सी, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. आद्रकमध्ये पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. आयुर्वेदात आद्रकाचे वर्णन अत्यंत उपयुक्त घटक असे आहे. शतकानुशतके आद्रकाच्या चहाचे सेवन केले जात आहे.

अंडी आपल्या शरीराला व्हिटामिन-डी पुरवू शकतात. अंड्याच्या आतील पिवळा बलक अतिशय पौष्टिक आणि प्रथिनेयुक्त असतो. यातून शरीराला व्हिटामिन-डी मिळतो. मांसाहारी लोकांसाठी 'मासे' हा व्हिटामिन-डीचा उत्तम स्त्रोत आहे. 'साल्मन', 'टूना फिश', 'कॉड लिव्हर ऑइल', 'हेरिंग फिश' इत्यादींमध्ये व्हिटामिन-डी मुबलक प्रमाणात आढळते. ताज्या संत्र्याचा अथवा फोर्टिफाइड संत्र्याचा रस व्हिटामिन डीची कमतरता भरून काढू शकतो. बाजारात टेट्रापॅकमध्ये मिळणारा संत्र्याचा रसही तुम्ही पिऊ शकता. संत्र्याच्या रसामुळे शरीराला 12 ते 15 टक्के व्हिटामिन-डी मिळते. दही खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन-डी देखील मिळते. म्हणूनच आहारात याचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपल्या शरीराला व्हिटामिन-डीची कमतरता भासणार नाही.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *