31 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - रोहित पवार देणार रोजगार...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. ‘लस नाही तर दारू नाही’,
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक चिंतेत आहेत. झपाट्याने पसरलेल्या या लाटेने कहर केला. तसेच करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शंका देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे देशात लसीकरण केले जात आहे. मात्र बरेच लोकं लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एक अजब नियम केला आहे. या नियमामुळे उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील सैफईमधील प्रत्येक दारूच्या दुकानासमोर चर्चा सुरू आहे. या शहरात लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल तर दारू मिळणार नाही, अशी नोटीस लावण्यात आली आहे. ही नोटीस अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह यांच्या निर्देशानुसार लावण्यात आली आहे. या अजब आदेशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
No comments
Post a Comment