28 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - कोरोनामुळे दशक्रिया विधींसह अस्थीविसर्जनास ब्रेक...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. केदारेश्वर कोविड सेंटरला दानशूरांकडून मदतीचा ओघ सुरूच....!
पुणे येथील व्हाईटस्ट्रो ऍग्जोनेटर स्वाफ्टवेअर या कंपनीचे संचालक जयश केतुकले यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे प्रतिनिधी विनय कर्डीले, अक्षय कर्डीले यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे रामचंद्र कर्डीले पाटील यांच्या उपस्थितीत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केदारेश्वर कोविड सेंटरला ३५ हजार रुपये किंमतीचे मेडिसिन तसेच खाद्यपदार्थ देण्यात आले आहे.
2. कत्तलखान्यात नेणाऱ्या आठ गायांची पोलिसांनी केली सूटका
राहुरी तालूक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दिनांक २९ मे रोजी राहुरी पोलिसांनी कारवाई करत कत्तलखान्यात नेणाऱ्या आठ गायांची सूटका केली. राहता तालूक्यातील मोहम्मद नूर कालू शेख, अमजद फकीर मोहम्मद शेख या दोन आरोपींना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मागील आठवड्यात राहुरी शहरात 150 किलो गोमांस नेणारे वाहन पकडण्यात आले होते.
3. आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते शहरात विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत ३१ लाख ८४ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते रविवार दि.30 मे रोजी पार पडले, यावेळी प्रभाग क्र. ३ मध्ये ११ लक्ष ७९ हजार रुपये निधीतून महेश वेल्डिंग वर्क्स ते सुखसागर बिल्डिंग रस्ता, प्रभाग क्र. ८ मध्ये ७ लाख ३३ हजार रुपये निधीतून संजस्वा हॉटेल, जगताप घर ते नाला रस्ता व प्रभाग क्र. २ मध्ये १२ लक्ष ७१ हजार रुपये निधीतून श्रीरामनगर ते बँक कॉलनी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
4. कोरोनामुळे दशक्रिया विधींसह अस्थीविसर्जनास ब्रेक
नगर औरंगाबादच्या सीमेवरील प्रवरा आणि गोदावरीच्या संगमावरील दशक्रिया विधींसह अस्थिविसर्जनालाही कोरोणाने ब्रेक लागल्याने या धार्मिक परंपरा विधीला ही मोठा खंड पडला आहे. नगर आणि मराठवाड्यातील मृत्यूचे संकट ओढवलेल्या कुटुंबियातील इतरांचा मात्र दशक्रिया आणि अस्थी विसर्जन विधी करता येत.
5. संगमनेरात लॉकडाऊनची ऐशी तैशी
संगमनेरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद केले आहेत. मात्र अनेक दुकानदार बाहेरून दुकाने बंद असल्याचे दाखवत दुसऱ्या मार्गाने ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश देत व्यवसाय करत असल्यामुळे, शहरात दिवसभर सर्वत्र गर्दीच गर्दी दिसते.
6. वादळाने घेतला चिमुकल्याचा जीव, तर तिघे जखमी !
शनिवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी झालेल्या वादळात देखील मोठे नुकसान झाले होते.मात्र जीवितहानी झाली नव्हती. परंतु रविवारीदेखील काही भागाला वादळ व पावसाने झोडपून काढले. या वादळातच बांधकाम सुरू असलेल्या एका घराची भिंत कोसळली अन् सहा वर्षांच्या चिमुकल्याचा त्याच मृत्यू झाला.
7. कोरोणामुक्त झाल्याशिवाय शिथीलता नको
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जण निष्काळजीपणा करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली आहे. आता काही अंशी रूग्णसंख्या कमी होत आहे. परंतु संपूर्ण तालुका कोरोनामुक्त झाल्याशिवाय नागरिकांना कुठल्याही प्रकारची शिथिलता देऊ नका.
8. तोतया अधिकार्यांचा हॉटेल मालकास गंडा
संगमनेर तालुक्यातील शिबलापुर संगमनेर रस्त्यावर असलेल्या शेळगाव शिवारातील हॉटेल न्यू कॉर्नरच्या मालकाला आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचं भासवत हॉटेलची तपासणी करण्याच्या बहाण्याने तीन तोतया अधिकाऱ्यांनी पंचवीस हजार रुपये लुटून पलायन केले. त्यामुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.
9. वयोवृद्ध आईला घराबाहेर काढलं मुलाविरोधात गुन्हा दाखल.
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे पोटच्या मुलाने आपल्या वयोवृद्ध आईला घरातून बाहेर हाकलून दिल्याची लाजिरवाणी घटना गेल्या मार्च महिन्यात घडली. वयोवृद्ध महिलेने पोलीस ठाणे गाठून घडलेली घटना पोलीसा समक्ष कथन केली आहे. राहुरी खुर्द येथील मित्र परिवार कॉलनीमध्ये अनुसया सिताराम डोळस साठ वर्षे महिला आणि तिचा मुलगा संदीप सून आणि नातवंडे शहरात होती.
10. अज्ञातांनी मारहाण करून रक्कम लंबविली
टाकळीभान येथे दुचाकीला दुचाकी आडवी लावून अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून खिशातील रक्कम आणि कागदपत्रे बळजबरीने काढून चोरटे दुचाकीवरून पर्याय झाले अशी फिर्याद टाकळीभान येथील परसराम पवार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
No comments
Post a Comment