मोठी बातमी - नगरकर संकटात असताना जिल्हा शल्यचिकित्सकांनी केला भ्रष्टाचार
News24सह्याद्री -
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सध्या सर्वच नागरिक याच चिंतेत आहे की कोरोणा कधी संपेल आणि मोकळा श्वास घ्यायला कधी मिळेल. मात्र या काळातही काही सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करण्यात गुंतले होते. कोरोना काळाचा फायदा घेत अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या काळात देखील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमवण्याचे काम अहमदनगरचे जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी केले. ते एकटेच या प्रकरणात सामील नाहीत, तर त्यांच्याबरोबर यापूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर हे सुद्धा सहभागी असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांनी केलं आहे
No comments
Post a Comment