28 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - राज्यभरात काळ्या बुरशीच्या आजाराचे ३२०० रुग्ण...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. वीज ग्राहकांकडे बिलांचे ६८६.२५ कोटी थकीत
ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागते. वीज खरेदीबरोबरच वीज वहनसाठीसुद्धा खर्च करावा लागतो. त्याशिवाय देखभाल व दुरुस्तीची कामे व इतर खर्च टाळणे शक्य नाही. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत भांडूप परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब वीज ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी ६८६.२५ कोटी रुपये आहे.
2. भटक्या कुत्र्यावर केला धारधार शस्त्राने वार
पिंप्रिमध्ये अज्ञात व्यक्तीने काल भटक्या कुत्र्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पिंपरीतील सांगवी येथे घडली आहे. त्याला डोक्यावर मार लागल्याने डोळे गमवावे लागतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पवार नगर, सांगवी येथे गुरुवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
3. देवेंद्र फडणवीसांनी मन जिंकलं
नागपूरमधील श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून 'सोबत' हा उपक्रम राबवण्यात आला. कोरोना महामारीच्या संकटात आई-वडील गमावलेल्या 100 मुलांना आधार देण्याचं काम या ट्रस्टद्वारे करण्यात येत आहे. या संस्थेच्या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलविण्यात आलं होतं.
4. राज्यभरात काळ्या बुरशीच्या आजाराचे ३२०० रुग्ण
कोरोना झालेल्या किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या आजाराचे राज्यात ३२०० रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. तर दरदिवशी १४,००० इंजेक्शनची आवश्यकता असताना राज्य सरकारला केवळ दरदिवशी सरासरी ४००० ते ५००० इंजेक्शन मिळत आहेत.
5. अदर पूनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याबाबत हायकोर्टाने मागितले उत्तर
५) कोरोनावर कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले. तर न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १ जून रोजी ठेवली.
6. सेलिब्रिटींना मिळणाऱ्या औषधांबाबत तपास करा
देशात कोरोनावरील औषधांचा आणि इंजेक्शन्सचा तुटवडा असताना, काही राजकीय नेत्यांना आणि सेलिब्रिटींना गरजू व्यक्तीला देण्यासाठी ही सर्व औषधे व इंजेक्शन्स उपलब्ध होत आहेत. पण त्यांना ही औषधे उपलब्ध कशी होतात? याचा तपास करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले.
7. मागास जिल्ह्यांत मृत्युसंख्येत तब्बल चारपट वाढ
राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास केला असता निदर्शनास येते.
8. ऑक्सिजनच्या मनमानी खरेदीला सरकारचा चाप
कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मनमानी खरेदी झाल्याच्या तक्रारी असून, यापुढे खरेदी कशा पद्धतीने करायची, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून काढण्यात येणार आहेत.
9. चालत्या वाहनानं घेतला अचानक पेट
नाशिक परिसरातील टोल नाक्यालगत असलेल्या साकोरे फाट्या जवळ पुष्ट्याने भरलेला ट्रकने गुरुवार दि२७ रोजी रात्री उशीरा शॉर्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला असावा अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच परिसरात पेट घेतलेल्या बर्निंग कारच्या थरारची पुन्हा आठवण परिसरातील नागरिकांना झाली.
10. आदिवासी अन् गरीब रुग्णांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक
कोरोनामध्ये ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. अशा संकटाच्या काळात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य कार्यालय अधीक्षक खुशरु पोचा यांनी विदर्भातील मागास भागातील आदिवासी आणि शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन बँक सुरू केली आहे.
No comments
Post a Comment