Breaking News

1/breakingnews/recent

27 मे सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पाठपुराव्यातून संगमनेरसाठी ६ रुग्णवाहिका...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  



TOP HEADLINES

१. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही
कर्जत पोलिसांच्या पुढाकाराने गोड केअर सेंटरमध्ये महिला रुग्णांच्या सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत विलगीकरण कक्षात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संकल्पना राज्यात प्रथमच कर्जत मध्ये राबविण्यात आली आहे हा उपक्रम राज्याला पथदर्शी ठरू शकतो कोरोना बधित केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल होतात काही जिल्ह्यातील सेंटरमध्ये महिला रुग्णांना त्रास झाल्याची उदाहरणे आहेत.

२. आकडेवारी लपविल्याची चौकशी करा
श्रीगोंदा तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारी प्रशासन लपवत असल्याचा कार्यकर्त्यांनी केलेला आरोप गंभीर असून,ही आकडेवारी खरंच लपवली गेलीये का ? याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत. 

३. दहा वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार
संगमनेर येथे हिवरगाव पठार येथील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीये हिवरगाव पठार भागामधील मिसाळ वस्तीच्या जवळील दहा वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीवर 55 वर्षाच्या नराधम व्यक्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथील की माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे आरोपीला घारगाव पोलीस यांनी अटकही केलीये या घटनेची आणि गुन्ह्याची नोंद घारगाव पोलीस स्टेशनला करून अल्पवयीन मतिमंद आणि अत्याचारित मुलीचे मेडिकल करण्यासाठी या मुलीला संगमनेर ग्रामीण रुग्णालय आणि अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आला आहे.

४. लग्नाच्या वाढदिवशी मानलेल्या भावाचा महिलेवर प्राणघातक हल्ला
लग्नाच्या वाढदिवशी मानलेल्या  भावानं महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डी मध्ये उघडकीस येतोय शहरातील रिंग रोड नजीक विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या विजय भाटे यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याच्या वादातून विजेच्या पत्नीच्या मानलेल्या भावानं वार वार केले.

५. थोरात यांचा पाठपुरावा तून तालुक्यासाठी सहा रुग्णवाहिका
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेमार्फत चंदनपुरी, धांदरफळ, जवळेकडलग, घारगाव, जवळेबाळेश्वर या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या या रुग्णवाहिकेचा लोकार्पण आमदार डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष दुर्गा ताई तांबे आणि कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या शुभहस्ते यशोधन जनसंपर्क कार्यालयामध्ये करण्यात आले याप्रसंगी रुग्णवाहिकेचे वरील चालकांचा ही सत्कार करण्यात आला.

६. टास्क फोर्स समिती स्थापन
कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकॉर्मयकॉसिस आजाराचे लक्षण आढळून येत आहेत आणि कोरोनाच्या  येणाऱ्या तिसऱ्या लाटेची  लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत  म्युकॉर्मयकॉसिस आणि संभाव्य तिसऱ्या  लाटेचा मुकाबला करण्यासाठी तालुका टास्क फोर्स समिती तयार केली आहे.

७. राजकीय वजन कूचकामी ठरल्याने हातापाया पडून डॉक्टर आणण्याची नगराध्यक्षांवर वेळ
कित्येक वर्षे नगरपरिषदेत सत्ता, स्वतःच्या घरातच नगराध्यक्षपद, घरातच आमदारकी, गल्ली ते दिल्ली सरकार यांचेच, कित्येकवेळा जनतेने यांना संधी देऊन सुद्धा गावात यांना ग्रामीण रुग्णालय देखील आणता आले नाही. गावात ग्रामीण रुग्णालय झाले असते तर अद्ययावत इमारतीसह सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर, सर्जन गावातच उपलब्ध झाले असते.परंतु तसे न झाल्याने यांना ‘हातापाया पडत डॉक्टर आणले’ असे म्हणायची वेळ नगराध्यक्षांवर आली आहे. म्हणजेच नगराध्यक्षांना स्वतःच्याच पक्षाचा नाकर्तेपणा मान्य आहे.

८. नेवासा मध्ये म्युकोरमयकोसिस चा पहिला बळी
राज्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यातही करोना पाठोपाठ या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे.श्रीरामपूर पाठोपाठ या आजाराने नेवासा तालुक्यात सर्वप्रथम सोनईत पहिला बळी गेल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सोनई परिसरातील सहा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सात दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचे पुणे येथे निधन झाले.

९. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरांवर लागले काळे झेंडे
अहमदनगर मधील संयुक्त किसान मोर्चा किसान सभा शेतमजूर आणि कामगार संघटनांच्या वतीने देशभर काळा दिवस पाळण्यात आला. नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी घरावर, गाड्यावर, ट्रक वर काळे झेंडे लावून निदर्शने केली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला साथ देण्यासाठी आपल्या घरावर काळे झेंडे फडकवत मोदी सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्याचे आव्हान विविध संघटना तर्फे करण्यात आले. 

१०. बिबट्याने कुत्र्यावर केला हल्ला
आरडगांव येथे रात्रीच्या वेळी शेळ्यांच्या आशेने आलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. शेतकर्‍यांनी आरडाओरडा सुरू केला. हे बघून परिसरातील शेतकरी जागे झाले. फटाके वाजवित टेंभे पेटविल्याने बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला यात कुत्रा गंभीर जखमी झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक  शेतकर्‍यांनी केली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *