शहराची खबरबात - लवकरच नागापूर बोल्हेगाव परिसराला फेज 2 द्वारे पाणी मिळणार
News24सह्याद्री - लवकरच नागापूर बोल्हेगाव परिसराला फेज 2 द्वारे पाणी मिळणार... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. लवकरच नागापूर बोल्हेगाव परिसराला फेज 2 द्वारे पाणी मिळणार
नागापूर, बोल्हेगाव परिसरातील फेज 2 पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यामुळे अनेक वर्षाचा पाणीप्रश्न मिटणार आहे.या भागाचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी नेहमीच प्रशासन पातळीवर पाठपुरवठा केल्यामुळे आज हे काम पूर्ण झाले आहे.नागापूर येथील साडेअकरा दशलक्ष लिटर पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पडले आहे.तरी या परिसरातील नागरिकांनी फेज 2 जलवाहिनीला आपले नळ कनेक्शन घ्यावेत यापुढील काळामध्ये या भागाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
2. नगरचा स्थापनादिन होणार ग्लोबल
ऐतिहासिक नगरच्या 531 वा स्थापना दिनानिमित्त ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी व नगर जल्लोष परिवार ट्रस्ट तर्फे जागतिक ग्लोबल पातळीवरील आपलं नगर गौरव कडून ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी दिली मूळचे नगरचे रहिवासी असलेल्या परदेशातील नामवंतांची व्याख्याने यात होणार आहे.
3. लसीकरण केंद्राला रोटरी प्रियदर्शनी क्लब ची मदत
कोरोनाच्या आलेल्या संकटकाळात रोटरी क्लब प्रियदर्शनी च्या माध्यमातून विविध मदत कार्य चालू आहे क्लबने सावेडी च्या लसीकरण केंद्राला मदत केली आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब प्रियदर्शनी चे अध्यक्ष गीता गिल्डा यांनी केले.
4. शहरात प्रथमच सौर हायमास्ट पथदिव्यांची लोकार्पण
माझी सभागृहनेते स्वप्नील शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभाग चारमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सौर हायमास्ट व पथदिव्यांचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नवले नगर मधील गजानन महाराजांचा मंदिर परिसरात झाले यावेळी विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर आरोग्य समितीचे प्रमुख डॉक्टर सागर बोरुडे कुमार नवले सुमित कुलकर्णी अमित गटणे आदी उपस्थित होते.
5. नेप्ती उपबाजार समितीमध्ये पहिल्याच दिवशी 30 टक्के चा आवाक
कोरोणा च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या 25 दिवसांपासून बंद असणारा नगर बाजार समितीचा नेप्ती उपबाजार भाजीपाला व फळांच्या खरेदी-विक्रीने गजबजून गेला . बुधवारी पहिल्याच दिवशी 30 टक्के ची आवक झाली त्यामध्ये दोनशे 30 क्विंटल इतका भाजीपाल्याची आवक झाली तर 36 क्विंटल फळांची आवक झाली झाली.
No comments
Post a Comment