Breaking News

1/breakingnews/recent

27 मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - शैक्षणिक वर्षासाठी अद्याप मार्गदर्शक सूचना नाहीत...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. ७० टक्के तरुणांना हवा केवळ चार दिवसांचा आठवडा
भारतातील बहुतांश तरुण कर्मचाऱ्यांना ४ दिवसांचा कामकाजी आठवडा हवा आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १० पैकी ७ तरुण कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजी आठवड्याच्या बाजूने कौल दिला आहे.'सायट्रिक्स सिस्टिम्स'ने केलेल्या 'बॉर्न डिजिटल इफेक्ट' सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

2. देशातील सरकारी नोकऱ्या तीन वर्षांच्या नीचांकावर
 वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये सरकारी नोकऱ्या घटून तीन वर्षांच्या नीचांकावर गेल्या आहेत. या वर्षात केंद्र सरकारने २७ टक्के, तर राज्य सरकारांनी २१ टक्केच नोकर भरती केली आहे.राष्ट्रीय निवृत्ती वेतन यंत्रणेच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

3. कोविड औषधांना जीएसटी माफी देण्याचा विचार
कोविड-१९ वर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे आणि इतर साहित्यावरील वस्तू व सेवा कर  माफ करण्याचा विचार सरकार करीत आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

4. यास चक्रीवादळाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसणार
यास चक्रीवादळाचा सर्वात मोठा तडाखा पश्चिम बंगालला बसला असून, तेथील तीन लाख घरांचे नुकसान झाले आहे. पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये मिळून १५ लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक कोटी लोकांना फटका बसला असल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

5. सरकारकडे ९ जूनपर्यंत कागदपत्रे मागणार नाही
भ्रष्टाचार, पोलीस बदल्या व बढत्यांप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या तक्रारीसंबंधीची कागदपत्रे ९ जूनपर्यंत राज्य सरकारकडून मागणार नाही, असे सीबीआयने बुधवारी उच्च न्यायालयात सांगितले. सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी न्या. एस .जे. काथावाला व न्या. एस.पी. तावडे यांच्या खंडपीठात ही माहिती दिली.

6. बापाला शवविच्छेदनासाठी बाईकवरून न्यावा लागला मुलाचा मृतदेह
प्रशासनाचा कारभार किती बेजबाबदार असू शकतो, याची प्रचिती उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये आली आहे. आपला मुलगा गमावलेल्या एका वडिलांवर त्याच मुलाचा मृतदेह दुचाकीवरून शवविच्छेदनासाठी नेण्याची वेळ आली. सीतापूरच्या जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला. मदतीसाठी लाचार झालेल्या वडिलांनी मृतदेह नेण्यासाठी गयावया केली. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे वडिलांना मुलाचा मृतदेह दुचारीवरून न्यावा लागला.

7. शैक्षणिक वर्षासाठी अद्याप मार्गदर्शक सूचना नाहीत
यंदाचे शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष हे येत्या १४ जूनपासून सुरू होणार आहे, असे शिक्षण विभागाकडून उन्हाळी सुट्टी संदर्भातल्या परिपत्रकात जाहीर केले आहे. मात्र, मे महिनाअखेर ही नवीन शैक्षणिक वर्षात ते यंदा कसे सुरू करणार, ते ऑनलाइन असणार का ऑफलाइन, मुख्याध्यापकांसाठी काय मार्गदर्शक सूचना आहेत याबाबत काहीच माहिती शाळांना देण्यात आलेली नाही. 

8. छत्रपतींच्या सन्मानाबद्दल आम्हाला काँग्रेसने शिकवू नये, प्रवीण दरेकर
भाजप सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच बनवले. त्यामुळे मराठा आरक्षण असो किंवा छत्रपतींचा सन्मान याबद्दल भाजपला शिकविण्याची गरज नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसला फटकारले.

9. तत्काळ भरपाई देण्याचे आदेश
घराचा ताबा मिळविण्यासाठी विकासकाच्या दारावर हेलपाटे मारणारे सर्वसामान्य ग्राहक आपल्याला पावला पावलावर सापडतील. पण पुण्यातील एका विकासकाने सुरक्षा दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांनाच तब्बल १३ वर्षे हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्राहक मंचाने याची गांभीर्याने दखल घेत तत्काळ भरपाई देण्याचे आदेश विकासकाला दिले आहेत.

10. केशरी शिधापत्रिकाधारकांना जूनमध्येही सवलतीत अन्नधान्य
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यांचे सवलतीच्या दरात जूनमध्ये पुन्हा वाटप करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *