26 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - योगगुरु रामदेव बाबा यांना १ हजार कोटींची नोटीस...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
१. प्रियांका गांधींनी मोदींना विचारले तीन प्रश्न
देशातील अनेक राज्यांमध्ये लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कॉंग्रेस मोदी सरकारच्या लस धोरणावर सतत प्रश्न उपस्थित करत आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट व्दारे ‘जबाबदार कोण?’ असे लिहित काही प्रश्न उपस्थित केले. “आता लशीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे.
२. योगगुरु रामदेव बाबा यांना १ हजार कोटींची नोटीस
योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता आयएमएच्या उत्तराखंड शाखेनं योगगुरु रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. अब्रुनुकसानीसाठी १ हजार कोटींची भरपाई द्यावी लागेल, असं या नोटीसीमध्ये सांगण्यात आलं आहे.
३. कुस्तीपटू सुशीलसोबत कटात सहभागी असलेल्या ४ जणांना बेड्या
छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येचा उलगडा होऊ लागला आहे. कुस्तीपटू सुशील कुमार याला अटक केल्यानंतर त्याच्यासोबत कटात सहभागी असलेल्या लोकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. नीरज बवाना गँगच्या ४ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेच्या दिवशी नीरज बवाना गँगचे गुंड तिथे उपस्थित होते. त्यांच्या मदतीने सुशील कुमारनं सागर धनकड काटा काढला होता.
४. खेलो इंडिया'अंतर्गत राज्याला 200 कोटींचा निधी मिळण्याची मागणी
खेलो इंडिया अंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित असणाऱ्या पायाभूत सुविधेसाठी 200 कोटीं रूपयांचा निधी मिळावा,अशी मागणी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्याकडे केली. मंत्री केदार यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री श्री रिजीजू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध क्रीडाबांबी चर्चा केली.
५. रामदास आठवले राजभवनात
जगभरात आज गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापर्यंत सर्वच दिग्गजांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
६. नवाब मलिकांचा हल्लाबोल
शेतकऱ्यांनी सर्व देशवासियांना शेतकरी आंदोलनाला समर्थन करण्याचे आवाहन केले असून आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शवण्यास सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवीन कृषी कायदा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून करता येतो.
७. यास चक्रीवादळाचा मोर्चा आता झारखंडकडे!
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणाऱ्या धामरा बंदर आणि बालासोर दरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये तब्बल १२० ते १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनिशी हे चक्रीवादळ धडकलं. त्यामुळे किनारी भागात असणाऱ्या घरांचं आणि नागरी सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
८. प्रविण दरेकर यांचा ट्विटरद्वारे हल्लाबोल
भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता विधान परिषद विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”, अशी गत सध्या सचिन सावंत यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात! मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका! आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा!” असं प्रविण दरेकरांनी ट्विटद्वार म्हटलं आहे.
९. ६७ लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त
गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या हिंदुस्थानी बनावटीच्या विदेशी मद्याचे 625 खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण 67 लाख 57 हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
१०. सलमानच्या चित्रपटावर रिव्ह्यू देणे पडले महागात
अभिनेता सलमान खानचा चित्रपट 'राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई' ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांना भेटीला आला होता. त्यानंतर चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तर नेहमीच विविध चित्रपटांवर आपली समिक्षा देणारा अभिनेता कमाल आर खान म्हणजेच केआरके ने देखिल रिव्हू दिला होता.
Tags:
No comments
Post a Comment