२7 मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने खते विकल्यास होणार कारवाई....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. औरंगाबाद मध्ये जय भवानी नगर येथे शिवभोजन केद्रांचे ऊद्घाटन.
वाढत असलेल्या कोरोना परिस्थिती मुळे बेरोजगार ऊपाशी राहु नये यासाठी शिवभोजन योजना सरकारकडून चालु करण्यात आलेली आहे याचाच भाग म्हणून औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जयभवानीनगर येथे शिव भोजनालयचे उदघाटन करण्यात आले.
2. लवकी नदीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
औरंगाबाद अहमदनगर महामार्गावर आसलेल्या वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात असलेल्या शिवराई टोल नाक्याजवळ लवकी नदीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह बुधवारीसायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आला. मात्र हा घातपात की आत्महत्या आशी चर्चा परिसरात चालू आहे. मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू असताना, घटनास्थळाचे फोटो,व्हिडिओ परिसरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तरुणाची ओळख पटविण्यात मदत झाली.
3. सिडको येथे लसीकरण केंद्रावर १०० जणांचे झाले लसीकरण
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या सिडको परिसरात लसीकरनाला सुरवत झाली त्यात मागील काळात काही दिवस लसीचा तुडवडा जाणवत होता. त्या काळात मात्र सिडकोतील नागरिक लसी करणासाठी लसीकरण केंद्रावर जाऊन फेऱ्या मारत होते. मात्र आता मुबलक लस मिळाल्यानंतर गर्दी होऊ नये म्हणून दौलताबाद उपकेंद्राच्या अंतर्गत विविध लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. साईनगर सिडको मधील हनुमान मंदिर परिसर मधील १०० जणांना लस देण्यात अली.
4. विनाकारण बाहेर पडताय तर रहा अँटीजन टेस्टसाठी तयार !
कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच कल्याण डोंबिवलीतील नागरिकही बिनधास्त झाले असून खाडी किनारी गणेश घाटावर फेरफटका मारण्यासाठी नागरिकांची दररोज गर्दी होत आहे. याची माहिती मिळताच डोंबिवली पश्चिमेत विष्णूनगर पोलिस आणि पालिका अतिक्रमण विरोधी पथकाने रविवारी सायंकाळी नागरिकांना गाफील ठेवत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.
5. भंडाराचा राजा’ पोहोचवतोय वृद्धांना कोरोना लसीकरण केंद्रावर
भंडारा शहरातील मानाचा गणपती म्हणून भंडाराचा राजाची ओळख आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात हे मंडळ अग्रेसर आहे. रक्तदान शिबिरापासून ते विविध समाजोपयोगी उपक्रम कार्यक्रम या मंडळाने राबविले आहेत. विशेष म्हणजे, ' भंडाराचा राजा' या गणेश मंडळाने,कोरोना संकटात अनेकांना मदतीचा हात दिला. अनेक वयोवृद्ध लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यास असमर्थ ठरत आहेत. अशा वृद्धांसाठी गणेश मंडळाने ऑटोरिक्षाची निशुल्क सुविधा उपलब्ध करुन दिल्याने, त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
6. छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने खते विकल्यास होणार कारवाई
रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किंमती वाढल्या असल्या तरी जुन्या दरांची खते,त्याच दरात शेतकऱ्यांना विकणे खत विक्रेत्यांना बंधनकारक आहे. तसे निर्देश सुध्दा भंडारा जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. खतांच्या गोण्यांवरील छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने खते विकणाऱ्या खत विक्रेत्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा भंडारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिला आहे.
7. पुणे शहरात गुरुवारी ५४ केंद्रांवर कोव्हिशिल्ड
पुणे शहरात आज महापालिकेच्या ५४ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत. ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्यासाठी गुरूवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे.
8. शेजाऱ्यानेच मारला दागिन्यांवर डल्ला
ठाणे येथील वागळे इस्टेट, नेहरूनगर येथील एक गृहिणी किराणा माल आणण्यासाठी घराबाहेर पडल्याची संधी साधत तिच्या घरासमोर राहणाऱ्या राजू रसाळे याने तिच्या घरातील ८७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा एक लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
9. ३ हजारांच्या मदतीची घोषणा 'कायदेशीर' कात्रीत सापडली
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. या कालखंडात गरीबांना मदत करावी यादृष्टीने कष्टकºयांना तीन हजार रुपये मदत देण्याची घोषणा सत्ताधारी भाजपाने केली होती. कायदेशीर तरतूद न पाहताच घोषणा केल्याने लॉक डाऊन संपत आला तरी कष्टकºयांना मदत मिळालेली नाही, यावर नाराजी व्यक्त होत आहे. कायदेशीर तरतूद नसल्याने हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
10. शिवसेना नगरसेवकाची दादागिरी
अंबरनाथमध्ये शिवसेना नगरसेवकाने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक आकाशने रवीला 'तू बाहेर का फिरतो आहेस' असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्या कमरेला असलेला बेल्ट काढून रवीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच लोखंडी रॉडने देखील मारहाण करण्यात आली.
No comments
Post a Comment