शहराची खबरबात - विद्युत तारा नसलेला अहमदनगर शहरातील पहिला रस्ता
News24सह्याद्री - विद्युत तारा नसलेला अहमदनगर शहरातील पहिला रस्ता... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. महापौरपदाच्या निवडीसाठी अखेर मनपाकडून प्रस्ताव.
महापौरपदाच्या निवडीसाठीचा प्रस्ताव अखेर महापालिकेकडून विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. महापौरपदाची मुदत 30 जूनला संपत आहे. मुदत संपण्यापूर्वी नवीन निवड करणे आवश्यक असते. त्यानुसार महापालिकेच्या नगरविकास विभागाकडून नवीन निवडीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला.
2. विद्युत तारा नसलेला अहमदनगर शहरातील पहिला रस्ता
भिस्तबाग महाल ते भिस्तबाग चौक ते कुष्ठधाम रोड प्रोफेसर कॉलनी चौक ते तोफखाना पोलिस चौकी दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून हे काम लवकरच पूर्ण होवून नागरिकांसाठी खुला होणार आहे. हा रस्ता शहरातील मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या रस्त्यावरील विद्युत तारा जमिनी अंतर्गत घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
3. अखेर नगर अर्बनच्या चार शाखा बंद होणार
नगर अर्बन बँकेच्या चाकण आणि सिन्नर शाखा काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आल्या होता आता शिर्डी कोपरगाव तसेच पुणे येथील चंदन नगर आणि दौंड येथील तोट्यात असलेला शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 31 ऑगस्टपर्यंत या शाखा बंद करण्यात येणार आहेत वाढता तोटा कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर 21 मे रोजी झालेल्या ठराव रमणे हा निर्णय घेण्यात आला आहे
4. शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी पारदर्शकच
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या शिक्षक बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त खरेदी करण्यात आलेली घड्याळ खरेदी ही पारदर्शक झालेली आहे असा स्पष्ट अहवाल याबाबतच्या चौकशी समितीने दिला आहे. घड्याळ वाटपातील तांत्रिक कारणांना घोटाळ्याचे नाव देऊन विरोधी मंडळी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षक बँकेचा कारभार सभासद हिताचा व काटकसरीचा राहिला आहे. संचालक मंडळाने सभासदांसाठी अनेक हिताचे निर्णय घेऊन सभासदांना न्याय दिलेला आहे.
5. महात्मा फुले योजना प्रभावीपणे राबवणार आरोग्यमंत्री टोपेंची हॉस्पिटल वेलफेरला ग्वाही
राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हॉस्पिटल ला भेडसावणारे प्रश्न सोडविले जातील आणि या योजनेच्या आवश्यकतेनुसार पुनरावलोकन केले जाईल अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये.
No comments
Post a Comment