Breaking News

1/breakingnews/recent

26 मे सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - आठ दिवसात नगरपरिषद पूर्ण शहर निर्जंतुकीकरण करणार...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES


1. नगर जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद
अनेक कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना करोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नगर, पुणे जिल्ह्यासह 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. त्या जिल्ह्यांची यादीही जारी केली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. 

2. आठ दिवसात नगरपरिषद पूर्ण शहर निर्जंतुकीकरण करणार  
शेवगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदे मार्फत आजपासून शहरात निर्जंतुकीकरण व सॅनिटायझर फवारणी सुरू करण्यात आली आहे कोरोना बाधितांची रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. शासना मार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. 

3. पालकमंत्री आज पारनेर, श्रीगोंद्यात
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज  जिल्हा दौर्‍यावर असून ते सकाळी भाळवणी,  येथे येणार असून त्यानंतर भाळवणीच्या कोविड सेंटरची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पारनेर तालुक्यातील करोना सद्यस्थिती, त्यावरील उपाययोजना आणि लसीकरणाबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग यांच्यासमवेत आढावा बैठक घेणार आहेत.

4. ज्येष्ठ तमाशा कलावती कांताबाई सातारकर यांचे निधन
उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका साकारलेल्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर  यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. राज्यातील सर्वात मोठ्या तमाशा मंडळाच्या मालकीन असलेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत, राज्याचा पहिलाच विठाबाई नारायणगावकर पुरस्कार प्राप्त, तमाशा सम्राज्ञी श्रीमती कांताबाई सातारकर या कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या.
  
5. इंजिनिअर तरुणाचा म्युकरमायकोसिसने दुर्दैवी मृत्यू
श्रीरामपूर येथील एका इंजिनिअर असलेल्या 27 वर्षीय तरुणाचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. या तरुणास गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याने येथील श्रीरामपुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन घरी गेला होता. मात्र दोन दिवसानंतर 21 मे रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पुणे येथील रुबी हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

6. आघाडी सरकार घालवा; 'कुकडीचे' पाणी मिळवा
महा विकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर सुरू आहे कुकडी च्या डाव्या कालव्याचे वाटोळे याच राष्ट्रवादीने केल्याचा इतिहास आहे ज्या वेळी भाजपाचे सरकार आले त्या वेळी कुकडीच्या कामांना गती मिळाली आता डिंबे ते  माणिकडोह धरण दरम्यानचा बोगदा आमच्या सरकारच्या मंजुरीनंतरही होत नाही राष्ट्रवादीला नगरच्या कुकडी खालील शेतीचे वाटोळे करायचे आहे.

7. वीजबिले कमी करण्यास नगरपंचायतीचा पुढाकार
साईनगरीत हॉटेल लॉजिंग रेस्टॉरन्ट सह सर्व व्यवसाय बंद असताना महावितरणकडून हजारो रुपयांचे  वीज बिले येत आहेत या पार्श्वभूमीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीने वीज बिल कमी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे.

8. दोन गटांमध्ये तुफान हाणामारी  
पाथर्डी शहरात काल रात्री उशिरा दोन गटांमध्ये मोठी धुमश्चक्री उडाली होती दोन्ही बाजूने दगड लाठ्याकटीचं वापर करून अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली  नेमका हा प्रकार कशामुळे घडला याचा पोलीस तपास घेत आहेत मात्र कोरणा सारख्या गंभीर परिस्थितीतही काही समाजकंटक अजूनही सुधारायला तयार नाहीत दोन गटांमधील भांडणानंतर दोन्हीकडील काही लोक जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरासह पाथर्डी मध्ये उपचार सुरू आहेत.

9. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संगमनेरला ५ रुग्णवाहिका सुपूर्द
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा परिषदेतून संगमनेर तालुक्याला पाच ॲम्बुलन्स भेट देण्यात आले आहेत यामध्ये बराच वेळा रुग्णांची हेळसांड होते त्यांना तात्काळ सुविधा मिळावी या हेतूनं संगमनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या अंबुलन्सचे  वितरण करण्यात आले   या अंबुलन्सचे  पूजन करून तात्काळ रुग्णांच्या सेवेत  त्या दाखल करण्यात आल्या आहेत.

10. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी टास्कफोर्स समिती
कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे लक्षण आढळून येत आहे. तसेच कोरोनाच्या येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि 25 मे रोजी कोपरगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन म्युकरमायकोसीस व संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तालुका टास्कफोर्स समिती तयार केली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *