शहराची खबरबात - मनपा सावेडीमध्ये उभारणार हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प - आ. संग्राम जगताप
News24सह्याद्री - मनपा सावेडीमध्ये उभारणार हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प - आ. संग्राम जगताप... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. वैद्यकीय सेवा देणाऱ्या वर हल्ले केल्यास कठोर कारवाई
वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या लोकांवर झालेल्या हल्ल्याची व रुग्णालय तोडफोडीच्या घटनांचा निषेध आहे यापुढे वैद्यकीय सेवा देणाऱ्यांवर हल्ले झाल्यास व रुग्णालयाची तोडफोड वkruty करणार यावर खडक कायदेशीर कार्यवाही केली.
2. आयुक्तांची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालरोगतज्ञांशी बैठक
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका व मनपा आरोग्य समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील बाल रोग तज्ञ यांची बैठक घेतली गेली यावेळी आयुक्त शंकर गोरे म्हणाले की ोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर महापालिकेने पूर्ण क्षमतेने उपाय योजना केल्या आहेत कोरोनाच्या दुसरा लाटेमुळे सर्वांच्या सहकार्यातून योजनांतून कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
3. मनपा सावेडीमध्ये उभारणार हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प
कोरोनाबाबत उपाय करत असताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत होता. याच पार्श्वभूमीवर मनपा सावेडी अमरधामजवळ हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
4. आजारपणाला कंटाळून वृद्धाने कापली हाताची नस
आजारपणाला कंटाळून भिंगार मध्ये वृद्ध दाम्पत्यांनी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेत वृद्धाचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उष्णना रामण्णा वरगँठे असं मयत वृद्धाचे नाव आहे भिंगार येथील द्वारकाधीश कॉलनीत मंगळवारी सकाळी ही घटना घडली याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
5. भौगोलिक परिस्थितीनुसारच लसीकरण केंद्र
पावसाळा तोंडावर आल्याने शहराच्या भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येनुसार मंगल कार्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी मनपाने हे पाऊल उचलले आहे यावर बोलताना आयुक्त शंकर गोरे म्हणाले की नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
No comments
Post a Comment