Breaking News

1/breakingnews/recent

25 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री चक्रीवादळामुळे उन्हापासून नागरिकांना दिलासा....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. भंडारा जिल्ह्यातील प्लास्टिक कंपनीला भीषण आग
 भंडारा जिल्ह्यातील भंडारा- पवनी मार्गांवरील, पालगाव येथे अनेक वर्षांपासून असलेल्या उमा प्लास्टिक कंपनीत , आज मंगळवारला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास, भीषण आग लागली,  दरम्यान आगीच्या लाटा उंच, उठत असुन आगीमुळे सर्वात्र धुर पसरल्याचे दृश्य आहे. हा प्रकार पहाता  जवळील व आजूबाजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, दरम्यान याची माहीती संबंधित विभागाला देण्यात आल्याचे कळते.

2. चक्रीवादळामुळे उन्हापासून नागरिकांना दिलासा
उन्हाच्या तीव्र चटक्यांसाठी नावानी संबोधल्या जाणारा नवतपा आज मंगळवारपासून सुरू होत आहे. नवतपामध्ये उन्हाची लाट येत असली तरी, यावेळचे चित्र  काहीसे वेगळे राहणार आहे. कारण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्री - वादळामुळे उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

3. काँग्रेसचा  पंतप्रधान मोदी आणि भाजपावर प्रहार
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं. सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष यावरून भाजपाला धारेवर धरताना दिसताईत . तर भाजपाकडून महाविकास आघाडीला जबाबदार धरलं जात आहे. या वादात आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीची वेळ न दिल्याच्या मुद्द्याची भर पडली असून  राजकीय खडाजंगी होताना दिसतेय.

4. म्युकरमायकोसिसबरोबर करोना प्रतिबंधासाठीही काही महत्त्वाचे निर्णय- राजेश टोपे
कोणत्याच राज्यांना लसींच्या ग्लोबल टेंडरसाठीचा कोणताही प्रतिसाद अद्याप मिळाला नसल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. केंद्र सरकारने लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करावं. १८ चे ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी जर राज्यांकडे असेल तर आम्ही तुम्हाला पैसे देतो, आम्हाला लस खरेदी करुन द्या असं आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केलं आहे. 

5. राज्य सरकारच्या याचिकेत मध्यस्थी अर्ज
 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळावेत, यासाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेत आपल्यालाही प्रतिवादी करावे. तसेच ज्या मूळ खंडपीठाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले, त्याच खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी ठेवावी, अशी मागणी करीत अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

6. पिंपरीत महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजनची मागणी निम्याने घटली
 पुणे शहरातील महापालिका रुग्णालयांना एप्रिल मध्ये दिवसाला जळपास ५० टन ऑक्सिजन लागत होते. आता मे च्या शेवटच्या आठवड्यात २५ टन ऑक्सिजन लागत आहे   एप्रिलच्या तुलनेत आता निम्याने ऑक्सिजनची मागणी घटली आहे.

7. खाकीतील कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या खाकीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून आता 'म्युझिकल प्रोजेक्ट फॉर मुंबई पोलीस' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या खाकीतील कलाकारांना यूट्यूब प्लॅटफॉर्म तसेच, रिॲलिटी शोमध्ये संधी देण्याकरीता रेकॉर्ड केलेले व्हिडिओ शेअर करण्यात असून  मुंबई पोलीस दलात विशेषतः कोरोनाच्या काळात खाकीतील कलाकार मोठ्या प्रमाणात समोर आले.

8. जागतिक निविदेचा आज शेवटचा दिवस, आतापर्यंत समोर आले पाच पुरवठादार
मुंबई शहर आणि उपनगरातील लसीकरणाचा वेग वाढवितानाच भविष्यात प्रत्येक मुंबईकराला लस मिळावी, यासाठी महापालिका प्रयत्न करीत असून, आता यासाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहेत. याच जागतिक निविदेच्या कामाचा भाग म्हणून मंगळवारी याबाबतच्या निविदा दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 

9. फडणवीस-सामंत यांच्यात गुप्त भेट? उदय सामंतांनी केला खुलासा
भारतीय जनता पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे नेते, राज्याचे उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार होताना दिसून येत आहे. या दोघांमध्ये गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केलाय.

10. ‘म्युकोरमायकोसिस’ बद्दल  माहिती देण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्याची मागणी
पुणे येथे ‘म्युकोरमायकोसिस’ आजाराबाबतची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *