Special report - अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु
News24सह्याद्री - अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु.......पहा सह्याद्री special रिपोर्ट
सध्या लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी आहे . त्यामुळे शहरात होत असलेल्या बहुचर्चीत उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. उड्डाणपुलाचे सुमारे 85 खांब उभे राहिले असून त्यातील काही खांबांवर कॅप टाकण्याचे काम सुरू झाले आहे. उड्डाणपुलाचे काम वेळेच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी सांगितले. खूप दिवसांपासून शहरात उड्डाणपुलाचा विषय चर्चेत होता विविध राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत होते अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत शहरातील सक्कर चौक ते स्टेट बँक चौकापर्यंत उड्डाणपूल मंजूर झाला. त्यानंतर लष्करी भूसंपादनाचा अडथळा होता तोही मार्गी लागला त्यानंतर उड्डाणपुलाचे काम सुरू झाले काम सुरू असतानाही वाहतुकीचा अडथळा होता परंतु कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले ते निर्बंध अजून सुरू आहे त्या विकास कामे वगैरे वगळली परिणामी रहदारीचा होत असलेला अडथळा काही दूर झाला आणि उड्डाण पुलाचे काम वेगाने सुरू झाले उड्डाणपुलाचे सुमारे 85 खांब उभे राहिले आहेत आता काही खांबांवर kap टाकण्याचे काम सुरू आहे.
No comments
Post a Comment