Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - अखेर 'त्या' दृश्याबद्दल 'अद्वैत दादरकर'ने मागितली माफी!

No comments

  News24सह्याद्री अखेर 'त्या' दृश्याबद्दल 'अद्वैत दादरकर'ने मागितली माफी!..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES

1. देव त्यांचं भलं करो, पण कुत्र्यांच्या शर्यतीत चित्त्याला...! आदित्य नारायण

'इंडियन आयडल'चा 12 वा सीझन सध्या  वादामुळे चर्चेत आहे. होय, शोच्या 'किशोर कुमार स्पेशल एपिसोड'वरून सुरु झालेला हा वाद आता विकोपाला पोहोचण्याची चिन्हं आहे. आता कारणही तसंच आहे. या स्पेशल एपिसोडमध्य किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना स्पेशल गेस्ट म्हणून बोलण्यात आले होते. त्यांनी या शोवर टीका केली. यानंतर शोचा होस्ट आदित्य नारायणनेही या टीकेला उत्तर दिले आहे. 

2. इमरान हाश्‍मी झाला खलनायक
सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ऍक्‍शन थ्रिलर सिनेमा टायगर बाबत मोठी बातमी समोर आली आहे. डायरेक्‍टर मनीष शर्मा यांच्या या सिनेमात खलनायकाची भूमिका इमरान हाश्‍मी साकारत आहे. इमरान हाश्‍मीने सिनेमातील आपल्या भागांची शूटिंगही सुरू केली आहे. यशराज बॅनरखाली बनत असलेल्या या सिनेमा इमरान निगेटिव्ह भूमिकेत आहे. 

3. अखेर 'त्या' दृश्याबद्दल 'अद्वैत दादरकर'ने मागितली माफी!

झी मराठी वाहिनीवरील 'अगबाई सुनबाई' या मालिकेत कलाकाराने शिलाई मशीन ला लाथ मारल्याचे दृश्य दाखवण्यात आले होते. आणि या कारणावरून शिंपी समाज बांधवांकडून मालिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.


4. विराट कोहलीचा नवा लूक पाहून चाहत्यांना आठवला 'मनी हाइस्ट'मधील प्रोफेसर, व्हायरल झाला फोटो


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा नवरा विराट कोहलीचा नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्याच्या फोटोची तुलना स्पॅनिश लोकप्रिय वेबसीरिज मनी हाइस्टमधील प्रोफेसरच्या लूकशी केली जात आहे.


5. व्हाट्सअ‍ॅपवर 'राधे' शेअर करणार्‍यांची आता खैर नाही!

व्हाट्सअ‍ॅपवर 'राधे' शेअर करणार्‍यांची आता खैर नाही! 'राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई'  हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झालाय  आणि काही तासांतच ऑनलाईन लीक झाला. सिनेमाची पायरेटेड कॉपी अगदी व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडिया माध्यमांवर फिरू लागली. झी 5 ने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली असून  यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने भाईजानच्या सिनेमाची पायरेटेड कॉपी विकणा-या युजर्सची सर्व्हिस बंद करण्याचे निर्देश व्हाट्सअ‍ॅपला दिले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *