25 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - बालकांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स नेमला...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
१. श्री. रावसाहेब सिताराम बोरुडे यांचे निधन
अहमदनगर शहरातील हॉटेल व्यवसायाचे जनक तसेच माजी उपनगराध्यक्ष श्री. रावसाहेब सिताराम बोरुडे यांचे निधन झालाय.नगर शहरामध्ये बोरुडे यांनी अनेक हॉटेल्स यशस्वीरित्या चालवल्या त्यामुळेच त्यांच हॉटेल व्यवसायात मोठ नाव राहिलेय तत्कालीन नगरपालिकेचे ते उपनगराध्यक्ष होते नगरच्या सामाजिक जडणघडणी मध्ये बोर्डे परिवाराचा मोलाचा वाटा राहिला आहे.
२. बालकांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स नेमला
कोरोना च्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी टास्क फोर्स संघटित झाला त्याला आठ दिवस झाले तरी जिल्ह्यात किती बालके कोरोना ग्रस्त आहेत. किती बालकांनी पालक गमावल्यामुळे त्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. याची माहिती टास्क फोर्स कडे नाहीये ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
३. कोरणा चे 50% बेड रिकामेच
एप्रिल महिन्यात कोविड रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागली. रुग्णांना सोबत घेऊन बेडसाठी नातेवाईकांनी रुग्णालयाचे उंबरठे झिजवले. बेड मिळाले नाही म्हणून अनेकांना प्राणाला ही मुकावे लागले. बेड उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री प्रशासनाची ही झोप उडाली होती. आता मात्र रुग्णांची संख्या घटल्याने एकूण बेडच्या क्षमते पैकी 50 टक्के म्हणजे 14000 बेड रिकामेच असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही पंधरा हजारांच्या आत आलीये.
४.'फक्त यज्ञ करून कोरोना बरा होतो असे म्हणत असेलतर चुकीचे'
विलगीकरण कक्षात जर कोणी रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा न देता केवळ होमहवन किंवा यज्ञ करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी दिली आहे. कर्जत येथे पंचायत समितीत कोरोनाबाबत आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील स्व. वसंतराव झावरे कोविड सेंटर येथे भाजप नेते तथा माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी दाखल रुग्णांना बरे वाटावे यासाठी नुकताच एक विश्वशांती यज्ञ केला होता.
५. कोरोनाने आई-वडील गमावलेल्या मुलांना देणार मोफत शिक्षण
कोरोना महामारी च्या काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील किंवा दोघेही मृत झाले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी धन्वंतरी मेडिकल आणि एज्युकेशन फौंडेशन अहमदनगर यांच्यामार्फत एक हात पालकत्वाचा या योजनेअंतर्गत ढवळपुरी या ठिकाणी मोफत आणि निशुल्क शिक्षणाची घोषणा करण्यात आली .
६. विडी कामगारांना शासनाने आर्थिक अनुदान द्यावे
कोरोना महामारी च्या काळात रोजगार गेल्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक विवंचनेत सापडलेत प्रशासनाने कोरूना आटोक्यात आणण्यासाठी लोक डाऊन केला परंतु हातावर पोट भरणार्या कुटुंबांचे आर्थिक गणित त्यामुळे विस्कटले याच संकटात विडी कामगारांचा रोजगार ठप्प झाला असून शासनाकडून त्यांना आर्थिक अनुदान मिळावे यासाठी पद्मशाली समाज मंडळाच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
७. सध्याचा काळ सेवा करण्याचा, राजकारणाचा नाही
करुणा महामारी ही केवळ जागतिक अथवा एखाद्या देशावरचे संकट नसून तो मानवी जीवनावर चा मोठा आघात ठरला आहे ेल्या पंधरा महिन्यापासून त्याच्या प्रभावामुळे स्वास्थ्य प्रकृतीस आता मानसिकतेवरही परिणाम जाणवत आहे या आरोग्याचा आपत्ती पुढे व्यवस्था अपुर्या पडल्या आहेत आता लोकसहभागातून या मानवावरील संकटावर मात करावी लागेल सध्याचा काळ केवळ सेवाधर्म करण्याचा आहे.
८. पेशंटचे मनोरंजन आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम
त्रिमूर्ती कोविड सेंटर शेवगाव येथे पेशंटचे मनोरंजन आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी, एक आगळावेगळा उपक्रम घेऊन कोरोना पेशंट साठी ऑर्केस्ट्राचे आयोजन नगरसेवक सागर फडके यांनी केले होते, ऑर्केस्ट्रा च्या माध्यमातून पेशंटला कोरोना या आजारातून थोडे का होईना बरे वाटावे असा फडके यांचा उदेश होता.
९. गल्लीत जाऊन हा भाजीपाला विकावा मात्र एका जागी बसून तो विकू नये
संगमनेर मधील दिवसागणिक वाढत चाललेली रुग्णसंख्या सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे मात्र संगमनेर मधील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. संगमनेर शहरांमध्ये भाजीपाल्या सह प्रत्येक दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळते पोलीस अधीक्षक राहुल मदने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी स्वतः पायी चालत शहरातील दुकाने आणि भाजीपाला पोलिस बंदोबस्तामध्ये उठवला. तर मालदार रोडवर भाजीपाला खरेदी करण्यासाठी अक्षरशः जत्रे सारखा स्वरूप प्राप्त झालं होतं.
१०. राहुरी तालुक्यात खतांचा प्रचंड तुटवडा
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर तालुक्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून कोणी युरिया देतं का, युरिया? अशी आर्त हाक बळीराजा देत आहे. परंतु त्याची हाक ऐकायला एकही पुढारी व नेता तयार नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.एकीकडे करोना महामारीचे संकट तर दुसरीकडे लॉकडाऊन मुळे शेतीची पुरती वाट लागली. अशा दुहेरी संकटात सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा रासायनिक खताच्या तुटवड्यात सापडला आहे. सध्या तालुक्यात ऊस पिकासाठी व चारा पिकांसाठी युरिया खताची खूप गरज आहे. तसेच खरीप तोंडावर असल्याने मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे.
No comments
Post a Comment