Breaking News

1/breakingnews/recent

24 मे सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर आणि खोकर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  





TOP HEADLINES

1. मा.आ.राजीव राजळे कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना पंचपक्वान्नाचे भोजन  
पाथर्डी येथील आदी फाऊंडेशन,पाथर्डी नगरपरिषद आणि खरेदी विक्री संघ, यांचे विद्यमाने सुरू असलेल्या मा.आ.राजीवजी राजळे कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना,खरेदी विक्री संघाचे संचालक संदीप पठाडे यांच्याकडून पुरणपोळीसह पंचपक्वान्नाचे भोजन जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांच्या हस्ते  देण्यात आलय. पेशंटच्या जेवनानंतर,पत्रकार आणि कार्यकर्त्यांनाही या जेवणाचा दर्जा व आस्वाद घेण्याची विन्नती केली. 

2. कोरोनामुळे शेती मशागतीच्या कामांना ब्रेक
कोरोनाची लाट श्रीगोंदा तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन थडकली आहे. कृषीशी निगडित सर्व दुकाने बंद आहेत. अनेक शेतमजूर कोरोनाशी सामना करीत आहेत. परप्रांतीय शेतमजूर गावी निघून गेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. याचे अनिष्ट परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. 

3. मंत्री थोरात यांचा आमदार विखेंवर निशाणा
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील कोविड हेल्थ केअर सेंटरला रविवारी  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. त्यानंतर आयोजित एका बैठकीत मंत्री थोरातांनी आमदार विखे यांच्यावर निशाणा साधला. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात राज्यात भाजपची सत्ता असताना निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली होती. अनेकांनी या भागात येऊन ग्रामस्थांची मने दूषित करण्याचा प्रयत्न केला. काहींना गावबंदीसाठी पुढे करण्यात आल. आता ते कुठे गेले, हे शोधण्याची वेळ आली आहे.

4. देवगावमध्ये आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू लागू
नेवासा तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ते 20 ते 30 मे 20२१ पर्यंत आठ दिवसांचा खडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आला या कालखंडामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई सर्व गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुनीता गायकवाड यांनी दिली आहे.

5. बाईजामाता यात्रा उत्सव कोरोनामुळे रद्द  
नगर तालुक्यातील जेऊर गावचे आराध्य दैवत देवी बाईजामाता यात्रा उत्सव वैशाख बुद्ध पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.चालू वर्षी २६ मे  ला होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आलाय.  बाईजामाता देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखल जाते. यात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी राज्य तसेच परराज्यातून भक्त दर्शनासाठी येत असतात.या काळात इथे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. 

6. भोकर व खोकर शिवारात बिबट्याचा वावर  
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर आणि खोकर परिसरात बिबट्याचा धुमाकूळाने   परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत, शिवारातील शिंदे वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्कामाने  शेतकऱ्यांना घराबाहेर निघणे  मुश्किल झाल आहे. खोकर  शहरातील महेश पटारे यांची शेळी जाळी खालून नेऊन बिबट्याने फस्त केली आहे. 

7. साईभक्तांकडून वेगवेगळे टीकात्मक पडसाद
साईबाबा संस्थांनकडे मागणी नोंदविल्यानंतर घरबसल्या नि:शुल्कपणे साईबाबांची उदी प्रसाद दिली जाणार आहे, उदी संदर्भात मागणी नोंदविण्यासाठी साईबाबा संस्थानने व्हॉट्सअ‍ॅप नंबर साईभक्तांसाठी दिला असून या नंबरचे मोबाईल फोनवर व्हॉट्सअ‍ॅपला प्रोफाईल पिक्चर म्हणून अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सत्काराचा फोटो ठेवण्यात आला. हा नंबर समाज माध्यमांच्या माध्यमातून आज देश-विदेशात सर्वत्र गेला आहे. 
 
8. निळवंडे कालव्याचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ
राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेतलीय.यावेळी  निळवंडे कालव्यासंदर्भात  पत्रकारांना त्यांनी  सविस्तर माहिती दिली आहे. मागील दोन वर्षांपासून निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने गती दिली आहे. कोरोना कालखंडातही निळवंडे  धरणाच्या कालव्याचे काम प्रगतिपथावर आहे. 

9. यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
राहता, संगमनेर, कोपरगाव आणि अकोले या चार तालुक्यात येत्या खरीप हंगामामध्ये ५९,४६४ हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित असून या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे असे आवाहन संगमनेर विभागीय कृषी कार्यालयाकडून करण्यात आल आहे.

10. घारगावच्या स्मशानभूमीचा कायापालट
शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घरगावच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच अर्चना आहेर आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर यांच्या नियोजनातून घारगावच्या स्मशानभूमीचा कायापालट करण्यात आलाय. स्मशानभुमीतील रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ याठिकाणी करण्यात आलाय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *