Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - शेतकऱ्यांकडून छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास थेट कारवाई

No comments

 News24सह्याद्री - शेतकऱ्यांकडून छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास थेट कारवाई..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. शहरात  म्युकर मायकोसिस चे १०२ रुग्ण
कोरोना रुग्ण आता बरे होत असताना नव्याने म्हणजे म्युकर मायकोसिस आजाराने आता रुग्ण वाढू लागले आहेत नगर शहरामध्ये अठरा रुग्णालयांमध्ये  सुमारे एकशे दोन रुग्ण सध्या उपचार घेत आहेत . गेल्या दोन दिवसांमध्ये ही संख्या वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये जे काही रुग्ण आढळून आले आहे तसेच शहरामध्ये जे रुग्ण वाढत चालले आहे.

2. संग्राम जगताप यांच्या भाजप भेटीने उडाला संशयकल्लोळ  
भाजपच्या गांधी मैदान येथील संपर्क कार्यालयात रविवारी दुपारी नगरसेवकांची बैठक सुरू होती ही बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे भाजप पक्ष कार्यालयात आगमन झाले त्यांनी सुमारे अर्धातास भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली दरम्यान पक्ष कार्यालयातून बाहेर पडताच जगताप यांनी ही राजकीय भेट नव्हती वैयक्तिक कामानिमित्त आलो असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

3. आमरधाममधील राखेच करायचं काय ?
कोरोनामुळे  मृत्यू झालेल्या व्यक्तीवर नगर शहरात फक्त नालेगाव , अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जातात आता काही अंत्यसंस्कार तपोवन रोड येथील सावेडी परिसरातील कचरा डेपोत केले जात आहेत . त्यातच कोरोना मृतांची संख्या वाढलेली असतानाच स्म्शानात असलेल्या राखेचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील सर्वाधिक अंत्यसंस्कार होत असलेल्या अमरधाम स्मशानभूमी मध्ये राखेचे ढीग जमा होत आहे.

4. जूनमध्ये नगरकरांसाठी पुरेशी लस उपलब्ध होईल संग्राम जगताप 
आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं कि पावसाळा तोंडावर आला आहे लसीकरणाचे काम पुढील तीन महिने चालणार आहे त्या प्रत्येक प्रभागात मंगल कार्यालय भाडेतत्त्वावर घेऊन तिथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

5. शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतल्यास थेट कारवाई  
उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी शनिवारी शहरातील मार्केट यार्ड येथे कृषी सेवा केंद्राची पाहणी केली . यावेळी त्यांनी खतांच्या गोण्यांवर छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल शेतकऱ्याने बी-बियाणे खते व औषधे खरेदी ची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी असे आवाहन  करून दुकानदारांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या यावेळी तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले मंडल कृषी अधिकारी टकले उपस्थित होते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *