Breaking News

1/breakingnews/recent

2४ मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24सह्याद्री - गर्दी कमी करण्यासाठी ७००० कैद्यांना सोडणार!...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. वयाच्या ७३ व्या वर्षी आमदार उत्तीर्ण झाले एमएची परीक्षा
हरियाणातील जननायक जनता पार्टीचे आमदार ईश्वर सिंह यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे दाखवून दिले आहे. कोरोना काळाचा सदुपयोग करून त्यांनी शिकण्याची इच्छा पूर्ण करून ८५ टक्के गुणांसह ते कुरुक्षेत्र विद्यापीठातून एम. ए. प्रथम वर्ष परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

2. गोव्यात दहावीच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा
गोव्यामध्ये कोविडमुळे राज्यात लांबणीवर टाकलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षांबाबत येत्या बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी जाहीर केले.

3. राज्यस्तरीय वस्तुसंग्रहालयाचा आराखडा तयार - डॉ. मयूर ठाकरे
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वस्तुसंग्रहालय असणे गरजेचे असून, नुकतेच पुरातत्त्व वस्तू व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने एका राज्यस्तरीय वस्तुसंग्रहालयाचा आराखडा तयार केला आहे. त्याविषयी बोलणी चालू आहेत. हे वस्तुसंग्रहालय निर्माण झाल्यानंतर ते राज्यच नाही तर संपूर्ण देशाचे मोठे सांस्कृतिक केंद्र बनेल, असे शासनाच्या राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे सहायक पुरातत्त्व अभ्यासक डॉ. मयूर ठाकरे यांनी जागतिक वस्तुसंग्रहालय दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले.

4. मध्यप्रदेशात अनोख्या व्हेंटिलेटर एक्स्प्रेसची नि:शुल्क सेवा
कोरोना रुग्णांसाठी इंदूरचे तीन अभियंत्यांचे पथक राज्याच्या सरकारी रुग्णालयांत व्हेंटिलेटरशी संबंधित तांज्ञिक सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेत गुंतलेले आहेत.हे पथक केवळ केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडातून दिलेले नवीन व्हेंटिलेटरच लावत नाही तर जुन्या व्हेंटिलेटरची दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करून देत आहे.

5. गर्दी कमी करण्यासाठी ७००० कैद्यांना सोडणार?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झारखंड जिल्ह्यातील गर्दी कमी करण्यासाठी सुमारे ७,००० कैद्यांना अंतरिम जामीन किंवा पॅरोल दिला जाऊ शकतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांतर्गत हे पाऊल उचलले जात आहे.

6. आईच्या मृत्यूनंतर ९ वर्षाच्या मुलीचं भावूक पत्र व्हायरल
कोरोनाच्या या काळात काही ठिकाणी माणुसकीला लाजवणारीही घटना घडली. एका ९ वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कर्नाटकमधील या मुलीने आईचा मोबाईल गायब झाल्याने हे पत्र लिहिलं आहे.तिची आई कोरोना मुळे मृत पावली व हॉस्पिटलमध्ये तिचा मोबाईल चोरी गेला , तो परत मिळावा कारण त्यात तिच्या आईच्या आठवणी आहेत.

7. जमावबंदी मोडणाऱ्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ; सदाशिव लोखंडे
राज्यात जमावबंदी असूनही तीन मंत्री व अधिकाऱ्यांनी आदेशाचा भंग करून कार्यक्रम घेत असल्याने या मंत्र्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

8. कोरोनामुळे एसटीच्या २४५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
एस. टी. महामंडळातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य जाहीर केले होते. महामंडळातील साधारण आठ हजार पाचशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत एकूण २४५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, या परिपत्रकाच्या अनुषंगाने केवळ ११ कर्मचारीच हे सानुग्रह सहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत.

9. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इंधनाच्या विक्रीमध्ये सात टक्क्यांनी घट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या विविध भागांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध, तर काही राज्यांमधील लॉकडाऊनमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे फारशी उलाढाल झालेली नव्हती. त्यामुळे एप्रिल २०१९च्या तुलनेत यंदाच्या विक्रीमध्ये सात टक्क्यांनी कपात झालेली दिसून येत आहे.

10. अद्याप बालभारतीकडून पुस्तक छपाई नाही
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. परंतु, मे महिना संपत आला, तरीही अद्याप बालभारतीचे पुस्तक छपाईचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जून महिन्यात पुस्तकांविनाच शिक्षण सुरू करावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *