Breaking News

1/breakingnews/recent

23 मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - कोवॅक्‍सिनची लस घेणाऱ्यांना विदेश प्रवासात अडचण नाही...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


१. पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नुकतंच ‘तौते’ चक्रीवादळ धडकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून बचावकार्य करणाऱ्या यंत्रणा सावरल्या नाहीत, तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. ‘यास’ चक्रीवादळ येत्या २६ मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 

२. चीनमध्ये खराब वातावरणामुळे 21 धावपटूंचा मृत्यू, 8 जण जखमी
 चीनच्या वायव्य भागात गांसू प्रांतात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.. या मॅरेथॉन दरम्यान जोरदार वादळ आले आणि गारांसह मुसळधार पाऊस सुरू झाला asun  या भागातील तापमान मोठ्या प्रमाण खालावले. या मॅरोथॉनमध्ये 172 जणांनी सहभाग नोंदवला होता. परंतु जोरदार वारे, पावसामुळे 21 जणांचा मृत्यू झाला. तेव्हा या मॅरेथॉनमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला. बचाव कार्यासाठी 1200 जण कार्यरत होते. 

३. कोवॅक्‍सिनची लस घेणाऱ्यांनाही विदेश प्रवासात अडचण नाही
कोवॅक्‍सिन आणि कोविशिल्ड लस घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला अडचण येणार नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना जागतिक आरोग्य संघटना मान्यताप्राप्त लस हा महत्वाचा घटक असून त्यात कोवॅक्‍सिन आणि कोविशिल्ड यांचा समावेश नाही म्हणून  प्रवासासाठी अडचणी येणार असल्याबाबतची 

४. छत्तीसगड सरकारचा निर्णय
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं आहे. परीक्षांचा हंगाम असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे केंद्रीय शैक्षणिक मंडळाबरोबर राज्यांतील अनेक शैक्षणिक मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करत बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या. बारावीच्या परीक्षा कधी होणार? यावरूनही बरेच प्रश्न उपस्थित होताना दिसत असून, छत्तीसगड सरकारने बारावीची परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

५. ओडिशातील ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागांमध्ये देखील हा विषाणू वेगाने पसरत आहे . वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी नियमावलीही जारी केली आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण पडू नये यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. असं असताना ओडिशातील गंजम जिल्ह्यातील एका गावानं संपूर्ण देशासमोर आदर्श ठेवला आहे. या गावामध्ये आजतागायत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

६. दिल्लीत लॉकडाऊनचा अवधी वाढवला
दिल्लीत गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. दिल्लीतील करोना रुग्ण वाढीचा दर हा २.५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासात १६०० रुग्णांची नोंद झाली आहे. तरीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाउनचा अवधी एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

७. भारतीयांचा परदेशप्रवास अवघड
कोरोना लशींच्या तुटवड्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेला फटका बसला असून अनेक राज्यांमध्ये लसीकरण ठप्प झाले आहे. लसीकरणातील ही दिरंगाई आणि संथगती अशीच राहिली तर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध ३१ मेनंतरही उठण्याची शक्यता दृष्टिक्षेपात नाही. 

८. सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे ...त्यामध्ये  म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा पुरवठा केला जाईल याची काळजी घ्यावी आणि या विकाराने बाधित असलेल्या रुग्णांवर विनामूल्य उपचार करावेत अशी मागणी या पत्राद्वारे सोनिया गांधी यांनि केली आहे .

९. आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली
कोरोनाच्या पहिल्या लाटेतून विश्रांती मिळतेन् मिळते तोच दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं. त्यामुळे पहिल्या फळीतील कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे, असं असलं तरी दुसरीकडे डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना विरार पूर्वमध्ये घडली आहे. 

१०. शहरासह जिल्ह्य़ात काळी बुरशीचे ४६३ रुग्ण
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमधील करोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहरासह जिल्ह्य़ात ४३ विविध रुग्णालयांमध्ये तब्बल ४६१ म्युकोरमायकोसिसच्या  रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *