२4 मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - नागपूरमध्ये अज्ञात मारेकर्यांकडून तरुणाचा खून....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. Dysp सुधीर खिराडकरला औरंगाबाद घाटीत ठेवल्यामुळे आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक.
जालना येथे नोंद असलेल्या अट्राँसीटीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत करण्यासाठी 2 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडलेला आरोपी DYSP सुधीर खिरडकर याला औरंगाबाद घाटीमध्ये ऊपचाराचे कारण देऊन ठेवण्यात आले याचाच आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सचिन निकम यांनी प्रशासनाचा समाचार घेतला यावेळी गुनरत्न सोनवणे,मिलिंद दाभाडे सह भिमसैनिक ऊपस्थित होते..
2. कल्याणमध्ये चीमुरड्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेस अटक !
मुल जन्माला येत नसल्यामुळे त्रासलेले पालक दत्तक प्रक्रीयेनुसार मुले दत्तक घेण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत असतात.तर दुसरीकडे बेकायदेशीर दत्तक प्रक्रियेद्वारे मुलाची परस्पर खरेदी विक्री केली जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.मुल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांना हेरून त्यांना गरीब पालकांना पैशाचे आमिष दाखवत त्यांची मुले विकणाऱ्या महिलेला कल्याण स्टेशन परिसरात जिल्हा महिला व बाल सरक्षण कक्षासह कल्याण क्राइम ब्रांचने रंगेहाथ अटक केली आहे.
3. अड्याळ गावाजवळील किटाडी चौरस्ता येथे अस्वलाने दिले दर्शन
भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ गावाजवळील किटाडी चौरस्ता येथे मुख्य बाजारपेठे लगत असलेल्या झुडपामध्ये रवीवारला सकाळच्या सुमारास, मादी प्रजातिचे एक अस्वल दिसुन आल्याने, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. सदर प्रकाराची माहीती अड्याळ रेंजमधील कर्मचारी व भंडारा वनविभागाला देण्यात आली.माहीती मिळताच वनविभागाचं पथक स्थळी ताफ्यासह दाखल झाले. दरम्यान,परिस्थिती लक्षात घेता, नागरिक व झुडपात दडून बसलेल्या,अस्वलीच्या सूरक्षेचे नियोजन करुन, भंडारा RRU पथकाने अड्याळ रेंजमधील कर्मचाऱ्यांच्यासह अस्वलाला बाहेर येण्यास प्रवृत्त केले परंतु लोकांच्या जमावाने आवाज केल्याने, ती,परत झुडुपात शिरले.
4. जवाहरनगर पोलिसांची अवैध दारू अड्ड्यावर धाड
भंडारा जिल्हयाच्या जवाहरनगर पोलिस स्टेशनअंर्तगत येणाऱ्या शहापूर शेतशिवारातील कवडसी नाल्याच्या काठावर अवैधरित्या, मोहफुलपासुन तयार करण्यात येणारी, हातभट्टीची दारु गाळप करीत असल्याची,माहीती शुक्रवारी पोलिस स्टेशनला मिळाली होती. या माहीतीच्या आधारे, पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक एस.बी.ताजने यांनी कर्मचारी यांचेसह स्थळी पोहचून, अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकुन, ३४ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
5. मद्याच्या दुकानातून पावणे सात लाखांची रोेकड चोरी
ठाण्यातील मखमली तलावाजवळील एस लिकर्स या मद्याच्या दुकानातून तब्बल ६ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड आणि सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह मद्याच्या काही बाटल्याही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
6. नागपूरमध्ये अज्ञात मारेकर्यांकडून तरुणाचा खून
नागपूरमध्ये कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री अज्ञात मारेकर्यांनी एका तरुणाची हत्या केली. वृत्त हाती आले तेव्हा कोतवाली पोलीस तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी घटनास्थळी पोहोचले होते. रात्री ११.५० पर्यंत मृत अथवा मारेकऱ्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. चौकशी सुरू असल्याचे घटनास्थळाहुन पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी लोकमतला सांगितले.
7. नाशिककरांच्या काळजात पुन्हा धस्स झाले
नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर रूममधील सक्सेशन कॉम्प्रेसर यंत्रणेत अचानकपणे बिघाड झाला. जिल्हा रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशुंच्या स्पेशल न्यु बॉर्न केअर युनीट अर्थात चिमुकल्यांच्या अतिदक्षता विभागाशी संबंधित ही यंत्रणा आहे.
8. समीक्षक गणेश वसईकर यांच्या अकाली निधन
महाराष्ट्राचे कवी, तथा वसईतील समीक्षक गणेश वसईकर यांचे शनिवारी रात्री उशिरा दुःखद निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते मागील दीड महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु होते.धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या आधीच, दि 26 एप्रिल 2021 या दिवशी त्यांची पत्नी जागृती वसईकर यांचेही कोरोना आजाराने निधन झाले आहे.
9. पुणे शहरात सोमवारी ४५ वर्षांवरील नागरिकांचे ६५ केंद्रांवर लसीकरण
पुणे शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या पहिल्या डोससाठी ऑनलाईन बुकिंग सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे़. पुणे महापालिकेच्या ६५ केंद्रांवर याकरिता कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे़.
10. सरकारला आम्हाला खरोखरच मदत करण्याची इच्छा आहे का?
पुणे सरकारकडून बऱ्याच प्रतिक्षेनंतर रिक्षा चालकांना मदत करण्यासाठी लिंक जाहीर झाली. मात्र सर्व्हरच डाऊन असल्याने त्यावरची अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे जायलाच तयार नाही. रिक्षा पंचायतीसह आप व अन्य रिक्षा संघटनांचा आजचा दिवसभराचा हाच अनुभव होता.
No comments
Post a Comment