23 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - कुस्तीपटू सुशील कुमारला अटक...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कुस्तीपटू सुशील कुमारला अटक
छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी सुशील कुमारने दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता. या घटनेपासून सुशील कुमार फरार होता. सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता.
२. 341 चिमुरड्यांना कोरोनाची बाधा
कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेमुळं लहान मुलांना अडचणी निर्माण होणार असल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे. आता राजस्थानमधील दौसा येथे कोरोनाची तिसरी लाट आल्याची चिन्हे दिसत आहेत. दौसा येथे 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ही सर्व 341 मुले 0 ते 18 या वयोगटातील आहेत. 1 मे 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत या मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
३. नाशिकला २ कोविड रुग्णालयांची मान्यता रद्द
अवाजवी बिल आकारणी तसेच महापालिकेकडून मागणी करूनही बिलांची माहिती न दिल्याचा ठपका ठेवून नाशिक महापालिकेने दोन रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द करण्याची कारवाई केली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली. गंगापूर रोडवरील मेडीसिटी आणि पंचवटीतील रामालयम रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द करण्यात आली आहे.
४. कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
कराड शहरातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के आज जाणवले आहेत.
सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटानेहे भूकंपाचा सौम्य धक्के जाणवलेत. या धक्क्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
५. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची खाजगी रुग्णालयांकडून हेळसांड
राज्य सरकारने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सोय केल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ही रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारची घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले.
5. गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड
राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचं घबाड सापडलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरु होती.
६. संजय राऊतांची भाजपवर जळजळीत टीका
गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांना ऑक्सिजन किंवा लस मिळाली नाही. भाजपचे नेते म्हणतात त्याप्रमाणे कोरोना बरे करणारे गोमूत्र तरी त्यांना मिळायला हवे होते, अशी जळजळीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. आपण राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात वाहताना आणि तरंगताना पाहिला. यामुळे भारताचा भेसूर चेहरा जगासमोर आला. तरीही भाजपकडून कोरोना असो किंवा चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरुच आहे.
७. मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग कोल्हापुरमधून फुंकले जाणार
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग लवकरच कोल्हापूरमधून फुंकले जाण्याची शक्यता आहे. कारण, संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सोमवारी कोल्हापुरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कायदेतज्ञ आणि तालीम संस्थांचे प्रतिनिधी हजर असतील. शिवाजी पेठेतील शिवाजी मंडळाच्या सभागृहात सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल.
८. धनश्री व युजवेंद्रच्या फोटोमध्ये विराट कोहली
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलआणि त्याची बायको धनश्री वर्मा (पाठीमागच्या काही दिवसांपासून अचडणीत सापडले होते. चहलच्या आई बाबांना कोरोनाची बाधा झाली होती तर धनश्रीच्या आई आणि भावाला देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोघांच्याही कुटुंबातले सदस्य ठीक आहेत. घरातील सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे युजवेंद्र आणि धनश्रीने सुटकेचा निश्वास सोडलाय.
९. राष्ट्रवादी काँग्रेसचा पंतप्रधानांना टोला
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल अमेरिकेमधील ‘द कॉनव्हर्सेशन’ या वेबसाईटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली होती. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. या ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
१०. राजीव गांधींच्या आदरांजली सभेत राजीव सातव यांना श्रद्धांजली!
देशाचे माजी पंतप्रधान आणि सध्याच्या आधुनिक युगाचे शिल्पकार भारतरत्न राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करतानाच जिल्हा आणि शहर काँग्रेसने राजीव सातव व इतर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्याचा सोपस्कार शुक्रवारी पूर्ण केला.
Tags:
No comments
Post a Comment