Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांचे 1 जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्याचे संकेत

No comments

News24सह्याद्री - 





गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन संपणार का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे . अनेक  मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असल्यामुळे  शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.

कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले. निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाच वेळी शिथिल होणार नाही. तर, टप्प्याटप्प्याने या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. त्यामुळए राज्यातीन नागरिकांना दिलासा मिळण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय़ घेतले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *