Breaking News

1/breakingnews/recent

23 मे सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - रयत सेवकांची आरोळे कोविड सेंटरला दिड लाखाची मदत...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. कुकाण्यात जनता कर्फ्यूचा पहिला दिवस कारवाईचा
कुकाणा येथे शनिवारी ते रविवार  पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. पहिल्या दिवशी शनिवारी दुकाने वेळेत बंद न करणाऱ्या व्यावसायिकांसह विनाकारण फिरणारे, दुचाकीवरील नागरिक, विनामास्क फिरणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

2. रयत सेवकांची आरोळे कोविड सेंटरला दीड लाखाची मदत
कोरोना संसर्ग काळात जामखेड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त एक लाख एकावन्न हजार रुपये मदतनिधी जमा करून आरोळे कोविड सेंटरला आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दिला. डॉ. रवी आरोळे यांच्याकडे ही रक्कम सुपुर्द करण्यात आली.

3. निमंत्रण नसल्याने झाले नाराज
जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एकत्रित शनिवारी नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची पाहणी केली. मात्र, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना या पाहणी दौर्‍यासाठी सेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना डावलल्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या या नाराजी नाट्यावर धरण कालवे कामांची पाहणी करणार्‍या नेत्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची झाली आहे.

4. कोपरगांवच्या अमरधाम ला मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरूच - कृष्णा आढाव
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सेवा प्रतिष्ठान कोपरगाव च्या वतीने तालुक्यातील जनतेला आवाहन केले होते की, कोपरगाव शहरातील अमरधाम मध्ये कोरोना ने मृत्यू पावलेल्याच्या अंत्यविधीसाठी अत्यावश्यक साहित्य देणगी स्वरूपात दान करण्याची हाक दिली असता त्यास आज अखेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अजूनही मदतीचा ओघ सुरूच असल्याची माहिती जनसेवा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी दिली.

५. भाविकांनासाठी आनंदाची बातमी, घर बसल्या तीही मोफत मिळणार साईबाबांची उदी
जगभरातील करोडो भाविकांसाठी श्रद्धास्थानी असलेली साईबाबांची पवित्र उदी कोरोनाच्या संकटकाळात भाविकांच्या मदतीला निघाली आहे. स्थानिक शिवसेना पदाधिकारी व अनेक भाविकांच्या मागणीवरून साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांनासाठी बंद करण्यात आले आहे. 

6. श्रीरामपुरात विनाकारण फिरणार्‍या इसमांची रॅपिड टेस्ट
करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार 1 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवरून विनाकारण फिरणार्‍या इसमांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यात पॉझिटीव्ह रुग्णांची थेट कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली आहे.

7. कार्यारंभ आदेश नसल्याने शिर्डी बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले
राहाता शिर्डी बाह्यवळण रस्त्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाने जवळपास सव्वाबारा कोटीची निविदा काढली असून कत्राटदारही निश्चीत झाला आहे.मात्र कार्यारंभ आदेश नसल्याने बाह्यवळण रस्ताच्या कामास अद्याप सुरूवात झाली नाही. आठ-दहा दिवसांत पावसाळा सुरू होणार असून पावसाळ्यात डांबरीकरण केल्यास काम निकृष्ठ होऊन रस्त्याला मागचे दिवस पुन्हा येण्याची शक्यता आहे.

8. वीज कर्मचारी सोमवारी करणार काम बंद आंदोलन
महाराष्ट्र राज्यातील महावितरण, पारेषण व वीज निर्मिती कंपनीतील सर्व कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणे व कर्मचार्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय योजनेत परस्पर नेमलेला टिपीए बदलणे या मागणी साठी वीज कर्मचारी सोमवारी (दि.24) राज्यभर काम बंद आंदोलन आहे असा निर्णय प्रमुख संघटनांच्या संयुक्तिक समितीने घेतला आहे.

9. राहाता बाजार समितीकडून प्रवरा कोविड सेंटरला दहा लाख
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने शासन निर्देशाप्रमाणे आपल्या उत्पन्नातून 10 लाख रुपयांची मदत प्रवरा कोविड सेंटरला केली आहे. या रक्कमेचा धनादेश बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. विविध दानशुर व्यक्ती आणि संस्थानी एकूण 14 लाख रुपयांची मदत उपलब्ध करुन दिली आहे.

10. श्रीरामपूर तालुक्यात 390 जणांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात काल 148 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालपर्यंत 1131 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 390 होती. जिल्हा रुग्णालयात 42 खासगी रुग्णालयात 59 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 47 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 13342 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *